■ विविध सेवांचा लाभ देण्यास
■ १३ सेवांचा घेता येणार लाभ
चंद्रपूर १७ ऑगस्ट - चंद्रपूर महानगरपालिकेने व्हॉट्सॲपवर एक चॅटबॉट सेवा सुरू केली असुन यामुळे नागरिकांना एनओसी प्रमाणपत्रे, विविध परवानग्या, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे, तक्रारी नोंदवणे यासारख्या विविध सेवा आणि माहिती आता व्हॉट्सॲपवर मिळू शकेल. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन मा. पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी सदर चॅटबॉट सेवेचे उदघाटन करण्यात आले.
व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर लोकप्रिय व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲपद्वारे नागरीकांशी संवाद साधण्यासाठी करण्यात येतो. ही सेवा नागरिकांपर्यंत शासनाच्या तसेच मनपाच्या विविध योजनांचा आणि सेवांचा लाभ पोहचविण्याच्या उद्देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या सेवेअंतर्गत नागरिकांनी मनपाच्या व्हॉट्सॲप नंबर (8530006063) वर “hi” टाईप करून पाठविले तर , पुढील माहिती आपोआप येणे सुरु होते. नागरिकांना केवळ व्हॉट्सॲपवर मिळालेल्या सूचनांना प्रतिसाद द्यावयाचा असतो.
चंद्रपूर महापालिकेने सुरु केलेल्या व्हॉट्सॲप चॅटबॉट या सेवेत आता नागरिकांशी निगडीत १३ सेवा उपलब्ध केल्या आहेत. महापालिकेच्या विभागांमार्फत अनेक सेवासुविधा दिल्या जातात. यामध्ये नागरी सेवा सुविधा, परवाना काढणे, परवानगी घेणे, विविध दाखले, ना हरकत प्रमाणपत्र, तक्रार अशी अनेक प्रकारची माहिती नागरिकांना सहजपणे या व्हॉट्सअप चॅट बॉट सेवेच्या माध्यमातून २४ तास मिळू शकेल. नागरिकांना या सुविधा चंद्रपूर पालिकेच्या 8530006063 या व्हॉट्सॲप नंबरवर उपलब्ध आहेत.
1. तक्रार नोंदविता येणे शक्य
2. मनपा तक्रार निवारण मोबाइल ॲप डाउनलोड करता येईल
3. संपर्क साधणे शक्य
4. मालमत्ता कर भरणे
5. पाणी कर भरणे
6. व्यापार/व्यवसाय परवाना नोंदणी
7. जन्म प्रमाणपत्र विनंती
8. मृत्यू प्रमाणपत्र विनंती
9. विवाह नोंदणी विनंती
10.पाळीव प्राणी परवानगी
12. होर्डिंग /जाहिरात परवानगी
13. बेकायदेशीर होर्डिंगची तक्रार
12. होर्डिंग /जाहिरात परवानगी
13. बेकायदेशीर होर्डिंगची तक्रार
■ Chat Boat ( चॅटबॉट ) चे फायदे -
1. सेवा २४×७ सेवा उपलब्ध असते.
2. त्वरित प्रतिसाद मिळतो.
3. उत्तरांमध्ये सातत्य.
4. वैयक्तिकरण.
5. मानवी मदतीशिवाय आदेश देता येतो.
6. वेळेची बचत.
7. एकाच वेळेस अनेकांशी संवाद करणे शक्य
Chandrapur Municipal Corporation launched WhatsApp Chatbot, to provide benefits of various services, 13 services can be availed