चंद्रपुर महानगर पालिका तर्फे सेल्फी स्पर्धामाझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानमिळणार रोख बक्षीसे Selfie competition organized by Chandrapur Mahanagara Palika My soil my country and every home tricolor campaign Cash prizes will be awarded

चंद्रपुर महानगर पालिका तर्फे सेल्फी स्पर्धा

माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियान
मिळणार रोख बक्षीसे

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर ७ ऑगस्ट : चंद्रपूर शहर
महानगर पालिके तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरो घरी तिरंगा व माझी माती माझा देश अभियान राबविले जात आहे. सदर अभियानाच्या जनजागृतीसाठी पंचप्रण शपथ सेल्फी तसेच तिरंग्यासोबत सेल्फी स्पर्धा राबविली जाणार असुन यात सेल्फी घेऊन मनपाद्वारे दिल्या गेलेल्या गुगल शीटवर पाठविणाऱ्या काही भाग्यवान विजेत्या नागरीकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
   स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत संपुर्ण देशात व राज्यात मेरी माटी मेरा देश ( मिट्टी को नमन विरों को वंदन ) अभियान दि.९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२३ दरम्यान राबविले जाणार आहे. नागरिकांत आपली मातीविषयी जनजागृती प्रेम व साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा या यामागील उद्देश आहे.          
   माझी माती माझा देश अभियानात नागरिकांना हातात मातीचे दिवे अथवा माती घेऊन पंचप्रण शपथ घेऊन सेल्फी काढायची आहे व हर घर तिरंगा अभियानात राष्ट्रध्वजाचा पुर्ण सन्मान राखुन स्वतः च्या घरी लावलेल्या तिरंग्यासोबतचे क्षण सेल्फीद्वारे टिपुन चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दिलेल्या https://forms.gle/cszPxPNnkM6CDVJa6 या गुगललिंक वर पाठवायचे आहेत अथवा सोबत दिलेला QR कोड स्कॅन करावयाचा आहे.तसेच सेल्फी आपल्या सोशल मिडियावर सुद्धा अपलोड करावयाची आहे.  
    अपलोड करतांना #cmc #हर घर तिरंगा #merimatimeradesh #चंद्रपूर हे सर्व हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे. सेल्फीमध्ये घर व तिरंगा तसेच मातीचे दिवे अथवा माती हातात घेतली असल्याचे स्पष्ट दिसणे गरजेचे आहे. सेल्फी विथ तिरंगा स्पर्धेसाठी सेल्फी पाठविण्याची अंतिम तारीख १७ ऑगस्ट असुन पंचप्रण शपथ सेल्फी स्पर्धेची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२३ आहे. स्पर्धेनंतर ईश्वरचिट्ठीद्वारे निकाल घोषित करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी चंद्रपूर महानगरपालिकेच्या CMCchandrapur या फेसबुक पेजला भेट द्यावी तसेच स्पर्धेत मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी,तरुण व सर्व वयोगटातील नागरिकांनी यात सहभाग घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.    

Selfie competition organized by Chandrapur Mahanagara Palika

 My soil my country and every home tricolor campaign
 Cash prizes will be awarded

 #Loktantrakiawaaz
Chandrapur August 7: Chandrapur City Municipal Corporation is conducting Tricolor and Maji Mati Maja Desh campaign under Amrit Mahotsav of Freedom.  Panchpran oath selfie and tricolor selfie competition will be conducted for the awareness of the campaign and cash prizes will be given to some lucky winners who take selfies and send them on the google sheet provided by the municipality.
 Meri Mati Mera Desh (Mitti Ko Naman Viron Ko Vandan) campaign is going to be implemented in the entire country and state from 9th August to 30th August 2023 regarding the concluding activities of the Amritmahotsav program of Independence.  The aim is to create awareness, love and literacy about our soil among the citizens and to honor the heroes who fought for this motherland and sacrificed their lives for it.
 In Maji Mati Maja Desh Abhiyan, citizens have to take a selfie with mud lamps or mud in their hands and take Panchpran oath and in Har Ghar Triranga Abhiyan, they have to capture the moments with the tricolor planted at their homes by taking selfies with full respect for the national flag on the google link https://forms.gle/cszPxPNnkM6CDVJa6 provided by Chandrapur Municipal Corporation.  to send or scan the QR code provided along with it.Also upload the selfie on your social media.
 All hashtags must be used while uploading #cmc #har ghar triranga #merimatimeradesh #chandrapur.  In the selfie, it is important to clearly see the house and tricolor as well as clay lamps or clay in hand.  The last date for sending selfies for Selfie with Tricolor Contest is 17th August and the last date for Panchapran Swear Selfie Contest is 20th August 2023.  After the competition, the result will be announced through Ishwarchitthi.  For more information, please visit the Facebook page of Chandrapur Municipal Corporation CMCchandrapur and the Chandrapur Municipal Corporation is appealing to a large number of school students, youth and citizens of all ages to participate in the competition.

#chandrapur #cmc  #Chandrapur  #Selfy   #CMCchandrapur  #Chandrapur-Municipal-Corporation     #Facebook-page  #Tricolor-Contest 
Triranga-Contest  #Selfie