पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी संकल्प
जगविख्यात तज्ञांसह घेतलेल्या आढावा बैठकीत वन अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
चंद्रपूर, दि. 6 दिसंबर: विदर्भ ही वाघांची भूमी आहे; जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात; याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाची व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत देखील घेता येईल; यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास निश्चित मदत होईल यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे अश्या सूचना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख श्री शैलेंद्र टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री महिप गुप्ता, वनविकास महामंडळाचे सिजिएम श्री संजीवकुमार, श्री प्रशांत झुरमुरे, श्री कल्याणकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी एक सादरीकरण ना. सुधीर मुनगंटीवार यांना दाखविण्यात आले.
चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनी जवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प व्हावा असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा;अश्या प्रकल्पातून संशोधन व्हावे अशीदेखील अपेक्षा यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ना. मुनगंटीवार म्हणाले कि, सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहीती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा अशा सूचना यावेळी दिल्या.
An international standard tiger safari project will be done at Chandrapur, to promote tourism, Guardian Minister Sudhir Mungantiwar's ambitious resolution, suggested to forest officials in a review meeting with world-renowned experts
#Tadoba #Tiger #Tadoba-Tiger
#international-standard #tiger-safari-project #Chandrapur #promote-tourism #Guardian-Minister #Sudhir-Mungantiwar #ambitious-resolution #forest-officials #world-renowned-experts