🔶 अवघ्या एका महिन्यात ७० कोटींच्या गुटखा, बनावट औषध आणि भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश
🔶 ९०४ ठिकाणी धाडी
🔶 ४५७ आरोपी अटकेत
🔶 ३२२ आस्थापने सील
🔶 अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई
#Loktantra Ki Awaaz
मुंबई: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अवघ्या एका महिन्यात महाराष्ट्र राज्यभर धडक कारवाई करून गुटखा माफिया, बनावट औषध विक्रेते, भेसळखोर आणि बेकायदा व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या विशेष मोहिमेत सुमारे ७० कोटी रुपयांच्या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला असून, राज्यभरात ९०४ ठिकाणी छापे, ४५७ आरोपींना अटक, ३२२ आस्थापने सील आणि ४२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
एफडीएने गुटखा, पानमसाला, बनावट औषधे, बिनपरवानाधारक औषध विक्री, भेसळयुक्त अन्नपदार्थ, मेडिकल उपकरणांमधील अनियमितता तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विविध रॅकेटविरोधात व्यापक मोहीम उघडली आहे. या कारवाईमुळे राज्यातील अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तपासादरम्यान आंबा पेय, पॅकेज्ड ड्रिंक, चहा पावडर, खाद्यतेल, मसाले, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर अन्नपदार्थांमधील भेसळ उघडकीस आली. ४४० आस्थापनांवर कारवाई करून सुमारे २२ लाख किलो अन्नसाहित्य (सुमारे २९.११ कोटी रुपये मूल्य) जप्त करण्यात आले असून त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच ३४.६६ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला व इतर प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले.
याशिवाय, ५.५२ कोटी रुपयांच्या बनावट औषधे, वैद्यकीय उपकरणे, कॉस्मेटिक्स आणि अन्य उत्पादनांवरही कारवाई करण्यात आली. बिनपरवानाधारक औषध विक्री, बनावट औषधांची साखळी, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, वैद्यकीय उपकरणांच्या नियमांचे उल्लंघन आणि ट्रामाडॉल व कोडीनयुक्त औषधांच्या अवैध विक्रीची प्रकरणेही उघड झाली आहेत.
FDA एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितले की, गुटखा प्रकरणातील ४ ते ५ गंभीर प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी (मकोका) अंतर्गत कारवाईचा विचार सुरू असून, पुरावे आणि कायदेशीर बाबींची पडताळणी झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
महाराष्ट्र राज्यभर सुरू असलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अवैध व्यावसायिकांवर मोठा अंकुश बसला असून, पुढील काळातही अशाच कठोर मोहिमा सुरू राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.
FDA Commissioner Tukaram Munde's raid on FDA, gutkha, fake medicine and adulteration racket worth Rs 70 crores exposed in just one month,
Raids at 904 places;
457 accused arrested,
322 establishments sealed,
Food and Drug Administration takes major action across the state
#FDACommissionerTukaramMunde'RaidonFDA
#gutkha
#fakemedicine
#adulterationracketworthRs70croreexposedinjustonemonth
#raidsat904places
#457accusedarrested
#322Establishmentssealed
#FoodandDrugAdministrationtakesmajoractionacrossthestate
#FDA
#TukaramMunde
