समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू Five members of the same family from Chandrapur die in a horrific accident on Samruddhi Highway

💥 समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

 💥 चंद्रपूरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

#Loktantra Ki Awaaz 
चंद्रपुर : समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०६ जवळ हा भीषण अपघात घडला. या दुर्घटनेमुळे चंद्रपूर महानगरातील संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर  महानगरातील बाबुपेठ परिसरातील डी.एड. कॉलेजजवळ राहणारे जीवने कुटुंबीय रविवारी अकोला येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी वॅगनार कारने जात होते. धामणगावजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०६ परिसरात त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव वेगात जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात आरती जीवने (४०), भास्कर जीवने (५७), महादेव जीवने (४२), त्रिशा जीवने (१२) आणि लता जीवने (४३), सर्व राहनार डी. एड. कॉलेजजवळ, बाबुपेठ, चंद्रपूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्राथमिक तपासात भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून उभ्या कंटेनरला धडक बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या भीषण अपघातांमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जीवने कुटुंबाच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

👉🏻 ठळक मुद्दे
👇🏻👇🏻👇🏻
🔹धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०६ येथे अपघात.
🔹वॅगनार कारची उभ्या कंटेनरला भीषण धडक.
🔹चंद्रपूरच्या बाबुपेठ येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू.
🔹मृतांमध्ये १२ वर्षीय मुलीचाही समावेश.
🔹अकोला येथे कार्यक्रमासाठी जात असताना काळाचा घाला.
🔹पोलीसांकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.

Five members of the same family from Chandrapur die in a horrific accident on Samruddhi Highway 

#FivemembersOfthesame lfamilyfromChandrapurdieinahorrificaccidentonSamruddhiHighway