💥 28 जूनची परीक्षा पुढे ढकलली
💥 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मोठा निर्णय
💥 लाखो उमेदवार संभ्रमात
#Loktantra Ki Awaaz
पुणे, दि. 27 जून : देशभरात NEET 2026 परीक्षेतील गैरप्रकारांची चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 वरही पेपरफुटीचे सावट आले आहे. भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत काही संशयितांकडे TET 2026 प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी साधर्म्य असलेली माहिती आढळल्याचा प्राथमिक निष्कर्ष समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी 28 जून 2026 रोजी होणारी TET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकानुसार, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत परीक्षा घेणे उचित नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
👉🏻 हे आहे मुख्य मुद्दे
📌 28 जून 2026 रोजी होणारी TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
📌 भिवंडी येथे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला.
📌 संशयितांकडे आढळलेल्या माहितीतील काही प्रश्न TET 2026 प्रश्नपत्रिकेशी मिळते-जुळते असल्याचा प्राथमिक निष्कर्ष.
📌 भिवंडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
📌 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पडताळणी केली.
📌 परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय.
📌 नवीन परीक्षा दिनांक व पुढील सूचना लवकरच परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार.
📌 महाराष्ट्र राज्यभरातील लाखो TET 2026 परीक्षार्थींमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण.
👉🏻 परीक्षार्थ्यांना आवाहन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उमेदवारांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन परीक्षा दिनांक, प्रवेशपत्रे आणि इतर सूचना लवकरच जाहीर करण्यात येतील.
👉🏻 "NEET 2026 नंतर आता TET 2026 वरही प्रश्नचिन्ह"
स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक मजबूत सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी विद्यार्थी व पालकांकडून होत आहे.
After NEET 2026, there is a threat of paper leak in TET 2026 as well,
June 28 exam postponed,
big decision from Maharashtra State Examination Council,
lakhs of candidates in confusion
#NEET
#TET
After NEET 2026, there is a threat of #paperLeakinTET2026
#postponed
#MaharashtraStateExaminationCouncil
#candidatesinconfusion
#TETExam2026
