आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आवाहनानुसार रक्‍तदानाच्‍या उपक्रमाचा शुभारंभ , रामनवमी च्या शुभमूहूर्तावर चंद्रपूरात 5 रक्‍तदात्‍यांनी केले रक्‍तदान


 

चंद्रपुर, 02 अप्रैल (का. प्र.): माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या आवाहनानुसार आज रामनवमीच्‍या शुभमूहूर्तावर चंद्रपूर शहरात 5 रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान करून आयसोलेटेड रक्‍तदानाच्‍या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.
 
चंद्रपूर शहरातील इंडियन मेडीकल असोसिएशनच्‍या सभागृहात या उपक्रमाचा शुभारंभ मनिष महाराज, डॉ. किरण देशपांडे, डॉ. सतिश तातावार यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आला. यावेळी संजू शेड्डा, अमोल राऊत, पराग गंधेवार, शरद दुबे, प्रदिप अल्‍लुरवार या 5 रक्‍तदात्‍यांनी रक्‍तदान केले. दररोज 5 रक्‍तदाते रक्‍तदान करून या उपक्रमात सहभागी होणार आहे. कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. संचारबंदीमुळे रक्‍तपेढयांमधील रक्‍त पुरवठा कमी होत असून व रक्‍ताचा तुटवडा जाणवत असल्‍यामुळे महाराष्ट्र चे आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्‍या आवाहनानुसार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यांच्‍या मित्रपरिवाराला हा उपक्रम राबविण्‍याच्‍या सूचना दिल्‍या होत्‍या. त्‍यानुसार डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, राहूल पावडे, दत्‍तप्रसन्‍न महादाणी, प्रकाश धारणे, प्रशांत विघ्‍नेश्‍वर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. सुरक्षीत अंतर राखुन सोशल डिस्‍टन्‍सींग पाळून रक्‍तदानाची ही प्रक्रिया अविरत राबविणार असल्‍याचे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी यावेळी सांगीतले.