भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव २६१९ घरोघरी भक्तिभावाने साजरा - लॉकडाऊन मुळे इतर धार्मिक उत्सव रद्द


लोकतंत्र की आवाज़ चंद्रपुर न्यूज नेटवर्क
चंद्रपुर , 07 अप्रैल (का. प्र.):कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सकल जैन समाजद्वारे घरोघरी भक्तीभावपूर्ण वातावरणात व आलेले संकट दुर करण्याच्या प्रार्थनेसह महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


अहिंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आदर्श जगाच्या निर्मिती करिता महाविरांची अहिंसा, अनेकांत आणि अपरिग्रह या सारखे सिद्धांत आज सुध्दा उपयोगी आहेत. आज संपूर्ण जगाला महावीरांची  व त्यांच्या शिकवणीची अत्यंत गरज असुन हिंसा, हत्या, बर्बरता, भ्रष्टाचार ह्या सारख्या अंधकारात ज्ञान, अहिंसा पाळून, सत्य साधनेचे दीप प्रज्वलित करू शकतील अशा आदर्शाची पुनः स्थापना होणे नितांत आवश्यक आहे.

भगवान महावीरांनी अहिंसा परमो धर्म, जगा आणि जगू द्या हा संदेश संपुर्ण जगाला दिला आहे. जैन समाज ह्या शिकवणूकीचे तंतोतंत पालन करित असुन समाजाच्या सेवेचे व्रत पाळत आहे.

चंद्रपूर येथिल सकल जैन समाजा तर्फे दररोज कोरोना प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदी मुळे पिडीत ७०० लोकांना भोजन पुरवित आहे. भगवान महावीरांच्या जन्म महोत्सवा निमित्त जेवणासोबत प्रसाद म्हणून बुंदी व शेव देखिल देण्यात आली.

सकल जैन समाजा तर्फे घरोघरी  भक्तांबर पाठ, प्रार्थना तसेच नवकार मंत्र चे जप करण्यात आले. यावेळी सकल जैन समाजचे अध्यक्ष नरेश बाबू पुगलिया, योगेश बाबू भंडारी, निर्दोष पुगलिया, सुभाष जैन, डॉ.महावीर सोईतकर, राज पुगलिया, फेन भंडारी यांच्या नेतृवात संदीप बाठिया, जितेंद्र चोरडिया, अभय ओस्तवाल, नरेश तालेरा, तुषार डगली, जितेंद्र मेहर, पकंज मुथा, जितेंद्र जोगड, अमित बैद, अनिल बोथरा, प्रफुल्ल बोथरा, सुरेश चंडांलिया, यशराज मुनोत, आनंद तालेरा, प्रतिक कोठारी, दीपक मोदी  ऋषभ सकलेचा इत्यादी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या परिसरात जेवण तसेच प्रसाद वितरीत करण्यास मदत केली.