सावरकरांच्या जिवनातून राष्ट्रवादाची प्रेरणा - पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर     चंद्रपूर :   स्वातंत्र्यवीर  सांवरकरांचे जिवन सर्वांना प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यलढ्यात  त्यांचा सहभाग आणि सशस्त्र क्रांतीकारकांना त्यांनी दिलेली प्रेरणा यामुळे त्यांना क्रांतीकारकाचे मुकुटमनी म्हणुण संबोधले जाते. देशासाठी त्यांनी केलेला त्याग आणि सोसलेला कारावास अभुतपूर्व असा आहे. त्यांच्या जिवनापासुन प्रेरणा घेऊन आमच्यासारखे अनेक विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना आजच्या युवकांनी सावरकरापासुन राष्ट्रभक्तीची प्रेरणा घ्यावी असे आवाहन पूर्व केंद्रीयगृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले.


स्थानीक चंद्रपूर येथील भाजपा कार्यालयात सावरकर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे हस्ते रत्नाकर जैन, सुहास आवळे, प्रकाश आवळे, संजय जोशी, राजेंद्र तिवारी, गिरीष अणे, प्रमोद शस्त्राकार, खुशाल बोंडे, विजय राऊत, राजु वेलंकीवार, रवी येनारकर, राजु घरोटे, अनील फुलझेले, विकास खटी, राजेंद्र अडपेवार यांच्या उपस्थिीतीत स्वातंत्रयविर सावरकरांच्या प्रतीमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले