चंद्रपुर ,17 जून (जिला माहिती कार्यालय ,चंद्रपुर):
जम्मू कश्मीर मधील रहिवासी असणाऱ्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा स्वॅब वरोरा येथे १६ जून रोजी घेण्यात आला होता.
या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती कामठी येथील विशेष रुग्णालयात संदर्भित झाले असून त्यांचे राज्य जम्मू-काश्मीर असल्यामुळे त्यांची नोंद चंद्रपूर येथील बाधितांमध्ये घेतली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
भद्रावती येथे जम्मू येथून 10 जून रोजी सदर नागरिकाचे आगमन झाले. गृह अलगी करणात असणाऱ्या या व्यक्तीची 16 जुन रोजी तपासणी केली होती.
स्वॅब अहवाल 17 जून रोजी प्राप्त झाला. सदर व्यक्ती सध्या कामठी येथील विशेष रुग्णालयात संदर्भित करण्यात आला आहे.
त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधित म्हणून घेतली जाणार नाही आहे.
त्यामुळे १७ जूनच्या सायंकाळपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही ५४ आहे.
त्यापैकी केवळ २८ बाधित सध्या कोरोना ॲक्टीव्ह आहेत.