चंद्रपूर जिल्हात आणखी एक पॉझिटीव्ह बाधीताची संख्या पोहचली ४३ वर , चंद्रपुर महानगर मधील तुकुम परिसरातील सुमित्रा नगर भागातील रहवासी


चंद्रपुर ,10 जून : चंद्रपूर शहरांमध्ये बुधवारी तुकूम परिसरातील सुमित्रा नगर भागात रहिवासी असणारे ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी आलेल्या अहवालात ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधिताची संख्या ४३ झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून बाधीताला लक्षणे होती. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांना ८ जून रोजी खासगी रुग्णालयातून दाखल करण्यात आले होते. काल ९ जून त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्यांच्या परिवारात त्यांच्यासह एकूण पाच जण असून अन्य चार सदस्यांचीही स्वॅब तपासणी केली जाणार आहे. या बाधीताची प्रवासाची कोणतीही नोंद नाही.

    चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), 
१३ मे ( एक बाधीत) 
२० मे ( एकूण १० बाधीत ) 
२३ मे ( एकूण ७ बाधीत ) व 
२४ मे ( एकूण बाधीत २ ) 
२५ मे ( एक बाधीत ) 
३१ मे ( एक बाधीत ) 
२जून ( एक बाधीत )
 ४ जून ( दोन बाधीत ) 
५ जून ( एक बाधीत ) 
६जून ( एक बाधीत ) 
७ जून ( एकूण ११ बाधीत )
 ९ जून ( एकूण ३ बाधीत ) आणि 
१०जून ( एक बाधीत ) 
अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४३ झाले आहेत.
आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. 
त्यामुळे ४३ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता २० झाली आहे.