चंद्रपूर शहरात आणखी ४ नागरिक पॉझिटीव्ह , चंद्रपूर मधील लुम्बिनी नगर आणि बिनबा वार्ड , चंद्रपूर जिल्हातील ४३ बाधित कोरोना आजारातून झाले बरे , आतापर्यतची बाधित संख्या ६१ जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित १८


चंद्रपूर ,23 जून : चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणारे ३ व अन्य एक ३१ वर्षीय नागरिकाचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ६१ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या अॅक्टिव्ह बाधित यांची संख्या फक्त १८ असून आतापर्यंत ४३ नागरिक कोरोना आजारातून बरे झाले आहे.
       हैदराबाद शहरातून १६ जून रोजी आलेल्या लुंबीनी नगर भागातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणाऱ्या आई ( ४० वर्षीय ) वडील   ( ४७ वर्षीय ) व मुलगा ( २१ वर्षीय  ) बाधित असल्याचा अहवाल आला आहे. या तिघांचेही स्वॅब नमुने २२ जून रोजी घेण्यात आले होते. २३ जून रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
       तर बिनबावार्ड परिसरातील अन्य ३१ वर्षीय बाधित व्यक्ती सिकंदराबाद येथून १९ जून रोजी परत आला होता. आल्यापासून ते गृह अलगीकरणात होते. २२ जून रोजी त्यांचा स्वॅब नमुने घेण्यात आला. २३ रोजी अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे पुढे आले.

  चंद्रपूरमध्ये आतापर्यत 
२ मे ( एक बाधित ), 
१३ मे ( एक बाधित)
 २० मे ( एकूण १० बाधित ) 
२३ मे ( एकूण ७ बाधित ) 
२४ मे ( एकूण बाधित २ ) 
२५ मे ( एक बाधित ) 
३१ मे ( एक बाधित )
 २ जून ( एक बाधित ) 
४ जून ( दोन बाधित ) 
५ जून ( एक बाधित ) 
६ जून ( एक बाधित ) 
७ जून ( एकूण ११ बाधित ) 
९ जून ( एकूण ३ बाधित ) 
१०जून ( एक बाधित ) 
१३ जून ( एक बाधित ) 
१४ जून ( एकूण ३ बाधित )
 १५ जून ( एक बाधित ) 
१६ जून ( एकूण ५ बाधित ) 
१७ जून ( एक बाधित )
 १८ जून ( एक बाधित ) 
२१ जून ( एक बाधित ) 
२२ जून ( एक बाधित ) आणि 
२३ जून ( एकूण ४ बाधित )
अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ६१ झाले आहेत.आतापर्यत ४३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ६१ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता १८ झाली आहे.