ऊर्जानगर मधील त्यापूर्वी आढळलेल्या एका बाधितांच्या संपर्कातील एकूण तीन जण पॉझिटिव्ह , पोलीस दलाचा आणखी एक जवान, एकाच कुटुंबातील ३ जण पॉझिटीव्ह ,चंद्रपूर बाधितांची संख्या १३३ वर #Chandrapur #Corona133

ऊर्जानगर मधील त्यापूर्वी आढळलेल्या एका बाधितांच्या संपर्कातील एकूण तीन जण पॉझिटिव्ह

पोलीस दलाचा आणखी एक जवान,

एकाच कुटुंबातील ३ जण पॉझिटीव्ह

चंद्रपूर बाधितांची संख्या १३३ वर

आतापर्यत ७९ कोरोनातून बरे

 ५४ बाधितांवर उपचार सुरू

चंद्रपूर , 08 जुलाई (जिमाका): चंद्रपूर जिल्ह्यात आज आणखी ५ बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन जवानांसह १२८ झालेली सोमवारी रात्रीची संख्या बुधवारी १३३ वर पोहोचली आहे. मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नव्हता.

          जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने दिलेल्या माहितीनुसार आज पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर पोलीस कंपनीच्या या ३२ वर्षीय जवानाचा ६ तारखेला स्वॅब घेण्यात आला होता. ८ तारखेला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल पुढे आला आहे. त्यामुळे आतापर्यत राज्य राखीव पोलीस दलाच्या चवथ्या जवानाला कोरोनाची चंद्रपूरमध्ये लागन झाली आहे.

        ऊर्जानगर मधील त्यापूर्वी आढळलेल्या एका बाधितांच्या संपर्कातील एकूण तीन जण पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये बाधितांची ६० वर्षीय आई व सात वर्षीय नात यांच्यासोबतच सोबत या घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीचा देखील  समावेश आहे.

     आजच्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये वरोरा तालुक्यातील मोहबाळा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नागपूर येथून आल्यानंतर हा व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात न राहता एक दिवसासाठी घरी गेला होता. नंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांचा स्वॅब घेतला असता ते पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहे.

      जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत
 २ मे ( एक बाधित )
१३ मे ( एक बाधित) 
२० मे ( एकूण १० बाधित )
 २३ मे ( एकूण ७ बाधित ) 
२४ मे ( एकूण बाधित २ ) 
२५ मे ( एक बाधित ) 
३१ मे ( एक बाधित ) 
२ जून ( एक बाधित )
 ४ जून ( दोन बाधित )
 ५ जून ( एक बाधित ) 
६ जून ( एक बाधित )
 ७ जून ( एकूण ११ बाधित ) 
९ जून ( एकूण ३ बाधित ) 
१० जून ( एक बाधित )
 १३ जून ( एक बाधित ) 
१४ जून ( एकूण ३ बाधित )
 १५ जून ( एक बाधित ) 
१६ जून ( एकूण ५ बाधित )
 १७ जून ( एक बाधित )
 १८ जून ( एक बाधित ) 
२१जून ( एक बाधित ) 
२२ जून ( एक बाधित )
 २३ जून ( एकूण ४ बाधित ) 
२४ जून ( एक बाधित ) 
२५ जून ( एकूण १० बाधित ) 
२६ जून ( एकूण २ बाधित ) 
२७ जून ( एकूण ७ बाधित )
 २८ जून ( एकूण ६ बाधित ) 
२९ जून ( एकूण ८ बाधित ) 
३० जून ( एक बाधित )
 १ जुलै ( २ बाधित ) 
२ जुलै ( ४ बाधित )
 ३ जुलै ( ११ बाधित ) 
४ जुलै ( एकूण ५ ) 
५ जुलै ( एकूण ३ )
 ६ जुलै ( एकूण ७ )
 ८ जुलै ( एकूण ५ )

 अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १३३ झाले आहेत. आतापर्यत ७९ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १३३  पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ५४ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.