भारतीयांमध्ये प्रतिकार शक्ती इतर देशांच्या तुलनेत अधिक असून प्रधानमंत्री मोदीनी लाॅकडाउनची अचुक वेळ निवडली - प्रोफेसर एन.के.मेहरा , वेबिनार आयोजनातून प्रोफेसर एन.के.मेहरा यांनी प्रभावी व अभ्यासपूर्ण विमोचन #AIMS #ICMR #Covid-19 #Corona

वेबिनार आयोजनातून प्रोफेसर एन.के.मेहरा यांनी प्रभावी व अभ्यासपूर्ण विमोचन

भारतीयांमध्ये प्रतिकार शक्ती इतर देशांच्या तुलनेत अधिक असून प्रधानमंत्री मोदीनी लाॅकडाउनची अचुक वेळ निवडली  - प्रोफेसर एन.के.मेहरा
   
चंद्रपूर, 28 जुलाई (का प्र) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे त्वरीत करण्यात आलेली लाॅकडाऊन ची अंमलबजावणी व भारतीयांमधील कोरोनाशी मुकाबला करण्याची प्रतिकारशक्ती इतर देशाच्या नागरिकांच्या तुलनेत अधिक असल्यामुळे जगातील पश्चिम राष्ट्रापेक्षा कोरोनासारख्या महामारीमारीला नियंत्रित ठेवण्यात भारत यश संपादन करीत आहे असे संबोधन एम्स चे पूर्व संशोधन डीन आणि एम्स मधील आयसीएम आर च्या डॉ. सी. जी. पंडित चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर एन. के. मेहरा यांनी डॉ. गंगाराम अहीर चॅरिटेबल ट्रस्ट, आयएमए/आयुष चंद्रपूर/यवतमाळ च्या वतीने आयोजित वेबिनार च्या माध्यमातून केले.

   सदर वेबिनार ची संकल्पना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारातून साकार झाली असून प्रोफेसर एन. के. मेहरा यांचे चंद्रपूर येथे आयोजित विविध वैद्यकीय रोग निदान शिबिरात हंसराज अहीर यांनी पाचारण केले होते. हे वेबिनार सुद्धा हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांची फलश्रुती आहे. यावेळी चंद्रपूर व यवतमाळ येथील आदरणीय डॉक्टरांना कोरोना विषयी सविस्तर संबोधित केल्याबद्दल अहीर यांनी डॉ. एन. के. मेहरा यांचे आभार व्यक्त केले.

    वेबिनार च्या माध्यमातून प्रोफे. एन. के मेहरा यांनी पुढे भारतात, चीन मध्ये तसेच पश्चिम राष्ट्रांमध्ये कोरोनाची झालेली सुरुवात व तुलनात्मक स्पष्टीकरण दिले. भारतात कोरोना या गंभीर विषाणूचा समुदायातून प्रसार का झाला नाही याची सविस्तर माहिती त्यांनी सहभागी डॉक्टरांसमोर मांडली. भारतातील नागरीक खाणपाणात हळद, अद्रक, अश्वगंधा अन्य वस्तुंचा वापर करतात ज्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद जास्त असते. भारतात मलेरिया, टायफाईड, क्षयरोग अशा रोगांचा संसर्ग अधिक असल्याने भारतीयांमधील रोग प्रतिकारशक्ती सुद्धा अधिक असते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

     कोरोना विषाणू च्या धोक्याचा संपूर्ण ज्ञान घेऊनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी देशात लॉकडाऊन ची अंमलबजावणी केली, ज्यामुळे भारतात कोरोना नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे. मार्च 2020 व जुलै 2020 या काळाची तुलना करता आज अनेक नविन औषध उपचाराकरिता उपलब्ध असल्याचे मत डाॅ. एन. के. मेहरा यांनी मांडले. 

भारतातील इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये उत्तुंग वाढ झाली आहे. ज्यावेळी या रोगाची सुरुवात झाली त्यावेळी भारतात या विषाणूची ची चाचणी करण्यासाठी केवळ १ लॅब होती मात्र आज आपल्या देशात जवळपास १५०० लॅब च्या माध्यमातून टेस्टिंग होत आहे. म्हणजेच या अवघ्या काळात १५०० च्या जवळपास लॅब निर्माण करण्यात सरकारला यश आले आहे असेही यावेळी प्रोफे. एन. के. मेहरा यांनी या वेबिनार च्या माध्यमातून सांगितले.

     कोरोना विषाणूचे रोगनिदानशास्त्र, प्रतिकारशक्ती व विषाणूचे मजबूतपणा किती  आहे याचे संपूर्ण समीकरण डॉ. एन. के. मेहरा यांनी विषद केले. भारतीयांनी या अगोदर सुद्धा १०० वर्षांपूर्वी प्लेग, देवी, स्पॅनिश फ्लू असे घातक आजार बघितले आहे या तुलनेत कोरोना कमी घातक असल्याचे मत यावेळी त्यांनी मांडले. पुढे देशातील विलगीकरण केंद्र /अलगीकरण केंद्राचा सविस्तर आढावा त्यांनी वेबिनार च्या माध्यमातून सांगितला.

     कोरोना विषाणू वरील उपचार व खर्च याची सविस्तर माहिती देत काळा बाजार होऊ नये अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करीत या कोरोना संकटावर मात करण्यासाठी लस येण्याची आशा व या महामारीचा धोका आणखी कधी पर्यंत राहू शकतो याची माहिती सुद्धा यावेळी एन के मेहरा यांनी सहभागी डॉक्टरांना दिली. 

या वेबिनार च्या माध्यमातून सहभागी डॉ. मोरे (अधिष्ठाता, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. आर. पी. सिंग (अधिष्ठाता, यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), डाॅ. अनिल माडुरवार(चंद्रपूर आयएमए अध्यक्ष), डॉ. एस. जोशी (यवतमाळ आयएमए अध्यक्ष),डॉ. रितेश दीक्षित, डॉ. सुरभी मेहरा, डॉ. एम. जे. खान,  अशा सन्माननीय  डॉक्टरांनी डॉ. मेहरा यांना प्रश्न केले व त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर व निराकरण त्यांनी लगेच केले.

        डाॅ. खान यांनी डाॅ. एन.केे. मेहरा यांचा परीचय दिला तर वेबिनार चे संचालन डाॅ सुरभी मेहरा व आभार डाॅ. माडुरवार यांनी मानले. या वेबिनारच्या यशस्वीततेसाठी आयएमए/आयुष चंद्रपूर/यवतमाळ व  डॉ. गंगाराम अहीर चॅरिटेबल ट्रस्ट यांनी विशेष प्रयत्न केले.