आज रविवारी ३५ बाधित दाखल ; ४८ बाधिताना सुटी, जिल्हयात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू, कोरोना बाधितांची एकूण संख्या ११०५, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ७१८ बाधित कोरोनातून बरे

आज रविवारी ३५ बाधित दाखल ; ४८ बाधिताना सुटी,

जिल्हयात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू,

कोरोना बाधितांची एकूण संख्या ११०५,

चंद्रपूर  जिल्ह्यात आतापर्यंत ७१८ बाधित कोरोनातून बरे,

चंद्रपूर दि. १६ ऑगस्ट (जिमाका) : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. तसेच नागरिक देखील मोठ्या संख्येने अँटीजन चाचणीचा लाभ घेत असून लक्षणे वाटल्यास तातडीने तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 
       रविवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या ११o५  पर्यंत पोहोचली.  नगीना बाग परिसरातील ५४ वर्षीय पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
      चंद्रपूर जिल्ह्यात आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७१८ झाली आहे. तर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३७६ आहे. 
      आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतांशी बाधित हे अन्य आजाराने ग्रस्त होते. आज नगीना बाग येथील ५४ वर्षीय पुरुष निमोनियाने आजारी होता. १४ ऑगस्टला त्याना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात  दाखल  करण्यात आले होते. श्वसनाच्या गंभीर आजारामुळे दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग झाला होता. तपासणीनंतर कोरोना बाधित असल्याचे पुढे आले. वैद्यकीय यंत्रणेच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही १६ ऑगस्टला दुपारी त्यांचे निधन झाले.
         जिल्ह्यात आतापर्यंत नऊ जण मृत्युमुखी पडले असले तरी चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजारातून बरे होण्याची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. आज ४८ बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर विविध ठिकाणच्या चाचण्यांमध्ये ३५ बाधित पुढे आले आहेत. 
      यामध्ये सर्वाधिक बाधीत हे राजुरा येथील असून राजुरा तालुक्यातून 11 बाधित आज पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील सोनुर्ली, टेंभुर्वाही याठिकाणी बाधितांच्या संपर्कात आल्यामुळे रुग्ण वाढ झाली आहे.
          त्यानंतर चंद्रपूर शहरातील रुग्ण वाढ कायम असून आज 10 बाधित पुढे आले आहे.         
      शहरात मोठ्या प्रमाणात अॅन्टीजेन चाचणी सुरु आहे. तुकूम, ऊर्जानगर, रयतवारी कॉलरी, पोलिस कॉटर परिसरातील हे रुग्ण आहेत. या भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
     मुल शहरातील 6 बाधित पुढे आले आहेत. बाधिताच्या संपर्कातून हे रुग्ण पुढे आले आहेत.

      याशिवाय सावली(1) ब्रह्मपुरी(1) चिमूर(2) कोरपणा(1) भद्रावती(2) घुगुस(1) या ठिकाणी बाधित आढळून आले आहे.