श्रीकृष्ण जन्माष्टमी व पोळा/तान्हा पोळा सार्वजनिक ठिकाणी साजरा करू नये- जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

श्रीकृष्ण जन्माष्टमी व पोळा/तान्हा पोळा सार्वजनिक ठिकाणी साजरा करू नये-
 जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी 

चंद्रपूर दि.07 ऑगस्ट (का प्र) :श्रीकृष्ण जन्माष्टमी व पोळा/तान्हा पोळा सार्वजनिक ठिकाणी साजरा करू नये असा संदेश जिल्ह्यातील सबंधित यंत्रणेला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिला.

दि. ११ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी व दि. १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट रोजी पोळा/तान्हा पोळा साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाचे गृहविभाग यांचे परिपत्रक व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर यांचे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ३४, पोटकलम (ग) (सी) व (ड) (एम) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ४३ अन्वये अधिकाराचा वापर करून हा आदेश काढण्यात आला आहे.
कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परीस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमास बंदी आहे. त्याला अनुसरून श्रीकृष्ण जन्माष्टमी व पोळा/तान्हा पोळा सार्वजनिक ठिकाणी साजरा करू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.