चंद्रपूर शहर व परिसरातील 103, जिल्ह्यात 24 तासात 245 बाधित ; 4 बाधितांचा मृत्यू,बाधितांची एकूण संख्या 7524 #ChandrapurCoronaUpdate #Covid-19

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 4281 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 7524

उपचार सुरु असणारे बाधित 3134

जिल्ह्यात 24 तासात 245 बाधित ; चार बाधितांचा मृत्यू

चंद्रपूर, दि.19 सप्टेंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 245 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 7 हजार 524 वर पोहोचली आहे.यापैकी 4 हजार 281 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 134 बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी, होम आयसोलेशनमध्ये 723 जण आहेत.

जिल्ह्यात  24 तासात 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, दादमहल वार्ड, चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू बेळपाटळी, ब्रह्मपुरी येथील 49 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू संजय नगर, चंद्रपुर येथील 50 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, चवथा मृत्यू बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथील 66 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या चार मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 109 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 102, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली दोन, यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 
चंद्रपूर शहर व परिसरातील 103, 
पोंभुर्णा तालुक्यातील 4, 
बल्लारपूर तालुक्यातील 20, 
चिमूर तालुक्यातील 13, 
मूल तालुक्यातील 5,
 गोंडपिपरी तालुक्यातील 4, 
कोरपना तालुक्यातील 21, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 12, 
नागभीड तालुक्यातील 8, 
वरोरा तालुक्यातील 5,
 भद्रावती तालुक्यातील 23, 
सावली तालुक्यातील 3, 
सिंदेवाही तालुक्यातील 8 तर
 राजुरा तालुक्यातील 16 
असे एकूण 245 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील 
इंदिरानगर गायत्री चौक परिसर,
 घुटकाळा वार्ड, 
जगन्नाथ बाबा नगर, 
सिस्टर कॉलनी परिसर, 
रहमत नगर, 
जुनोना, 
बुद्ध नगर नगीना बाग,
 शंकर नगर, 
साईबाबा वार्ड, 
प्रगती नगर, 
रयतवारी कॉलनी परिसर,
 बंगाली कॅम्प परिसर,
 जटपुरा गेट परिसर, 
एकोरी वार्ड, 
बालाजी वार्ड, 
समाधी वार्ड, 
बाबुपेठ, 
दुर्गापुर,
 ऊर्जानगर,
 विवेकानंदनगर, 
स्वस्तिक नगर, 
वृंदावन नगर भागातून 
बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, राजेंद्रप्रसाद वार्ड, गणपती वार्ड, कन्नमवार महाराणा प्रताप वार्ड, श्रीराम वार्ड, पेपर मिल ओल्ड कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातून संत रविदास चौक, शिवाजीनगर खेड, गजानन नगरी,हलदा परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

भद्रावती तालुक्यातील झाडे प्लॉट परिसर, गणपती वार्ड गौराळा, सुर्या मंदिर वार्ड, आंबेडकर वार्ड, भोज वार्ड, ताडाळी,ऊर्जाग्राम, सुमठाणा, सुरक्षा नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील नांदाफाटा, नथ्थु कॉलनी परिसर, शांती कॉलनी परिसर, शिवाजी चौक, हिरापूर भागातून बाधित पुढे आले आहे.

 चिमूर तालुक्यातील भासुली, खापरी, टिळक वार्ड, वडाळा पैकु, गांधी वार्ड, नेहरू वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, नवेगाव पांडव, भागातून बाधित ठरले आहे. 

राजुरा तालुक्यातील धोपटाळा, विरूर, लक्कडकोट, जवाहरनगर, रामनगर, हनुमान मंदिर परिसर, राजीव गांधी चौक, पेठ वार्ड, सास्ती परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील केसरवाही, पेठ गाव, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील चरूर खटी, वैष्णवी नगर, माढेळी भागातून बाधित पुढे आले आहे.