चंद्रपूर शहर व परीसरातील 205 बाधित, 24 तासात 439 बाधिताची नोंद ; 7 बाधितांचा मृत्यू,चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 9350 #ChandrapurCoronaUpdate

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 9350

24 तासात 439 बाधिताची नोंद ; 7 बाधितांचा मृत्यू

5362 कोरोनातून बरे ;3846 वर उपचार सुरू

चंद्रपूर, दि.26 सप्टेंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 439 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 9 हजार 350 वर पोहोचली आहे.यापैकी 5 हजार 362 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 846 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात सात बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, दादमहल, चंद्रपूर येथील 84 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू गणपती वार्ड, भद्रावती येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू तुकुम,चंद्रपुर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 19 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर येथील 71 वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 23 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

पाचवा मृत्यू बीएड कॉलेज परिसर, चंद्रपुर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 24 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

सहावा मृत्यू इंदिरानगर चंद्रपुर येथील 54 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 24 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, सातवा मृत्यू गडचिरोली येथील 64 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या सर्व मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 142 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 134, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 
चंद्रपूर शहर व परीसरातील 205 बाधित,
 पोंभूर्णा तालुक्यातील 2,
 बल्लारपूर तालुक्यातील 30, 
चिमूर तालुक्यातील 6, 
मुल तालुक्यातील 40, 
गोंडपिपरी तालुक्यातील 7, 
कोरपना तालुक्यातील 15, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 49, 
नागभीड तालुक्यातील 7, 
 वरोरा तालुक्यातील 12, 
भद्रावती तालुक्यातील 27,
 सावली तालुक्यातील 3,  
सिंदेवाही तालुक्यातील 9, 
राजुरा तालुक्यातील 22, 
यवतमाळ येथील 3
 तर गडचिरोली येथील 2 
असे एकूण 439 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील
 विश्वकर्मा नगर, 
रेल्वे नगर वार्ड, 
जगन्नाथ नगर, 
साई बाबा वार्ड, 
अंचलेश्वर वॉर्ड,
 विद्यानगर, 
नगीना बाग, 
अशोक नगर, 
लक्ष्मी नगर, 
शक्ती नगर दुर्गापुर, 
इंदिरानगर घुग्घुस,
 शिवाजीनगर, 
बापट नगर, 
आयुष्य नगर,
ऊर्जानगर, 
पठाणपुरा वॉर्ड, 
ठक्कर कॉलनी परिसर, 
गगनगिरी नगर दाताळा, 
चिचपल्ली,
 सरकार नगर, 
वडगाव,
 गंज वॉर्ड, 
माता नगर चौक परिसर,
 भिवापुर वॉर्ड भागातून 
बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील श्रीराम वॉर्ड, झाकीर हुसेन वार्ड, सिद्धार्थ वॉर्ड, बालाजी वार्ड, राजेंद्रप्रसाद वॉर्ड, दूधोली बामणी, शिवनगर वार्ड, फुलसिंग नाईक वार्ड, गोकुळ नगर,गणपती वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

चिमूर तालुक्यातील गांधी वार्ड, नेताजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील हळदी, चिमढा, सुशी दाबगाव, नांदगाव परिसरातून बाधीत ठरले आहे.

 राजुरा तालुक्यातील कामगार नगर, रामपूर, सास्ती, सोनिया नगर, सोमनाथपूर, धोपटाळा, विवेकानंद नगर, लक्कडकोट भागातून बाधीत पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील चिनोरा, हनुमान वार्ड, अभ्यांकर वार्ड, सुभाष वॉर्ड परिसरातून बाधित ठरले आहे. 

नागभीड तालुक्यातील मौशी, विद्यानगर, समर्थ मोहल्ला परिसर भागातून बाधित पुढे आले आहे. 

ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्ड, शांतीनगर, गांधिनगर, शेष नगर ,फुलेनगर ,मेंढकी, सावरगाव, नांदगाव, संत रविदास चौक, गजानन नागरी, लुंबिनी नगर, पेठ वार्ड, जानी वॉर्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नारंडा, कन्यका मंदिर परिसर, रामनगर कॉलनी परिसर, बीबी, हनुमान मंदिर वार्ड, आवारपूर भागातून बाधित ठरले आहे.

 भद्रावती तालुक्यातील गौतम नगर, गजानन नगर, स्नेहल नगर, घोडपेठ, विश्वकर्मा नगर, पांडव वार्ड, गौराळा, आंबेडकर वार्ड, परिसरातून बाधित पुढे आले आहे. 

सावली तालुक्यातील  जनकापूर, व्याहाड,भागातून बाधित ठरले आहे.