चंद्रपूर विधानसभा चे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार पुढील उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात #KishorJorgewar #चंद्रपूर

चंद्रपूर ,01 सेप्टेंबर (का प्र) : महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते. 

या कालखंडात चंद्रपूर शहरातील कडक लॉकडाऊन मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या लॉकडाऊन मध्ये समस्या जाणून घेणारा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे कोरोना पॉझिटिव्ह झाले. 

लॉकडाऊन च्या भीषण काळात नागरिकांना अन्न वाटप, धान्य किट वाटप .जनतेच्या सेवेत नेहमी तत्पर असणारे आमदार किशोर जोरगेवार हे कमी वेळेतच नागरिकांच्या मनात घर करून बसले आहे.

 याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी माहिती दिली की माझ्या विधानसभेतील जनता ही माझ्यावर प्रेम करणारी आहे, तुमचं प्रेम माझी शक्ती आहे या कोरोनाला हरवून मी लवकर पुन्हा जनसेवेत लागून आपल्या समस्या सोडविण्यासाठी येणार आहे.

चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे 2 दिवसआधी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना वन अकॅडमी चंद्रपूर मध्ये नेण्यात (एडमिट) आले होते.


परंतु  काल सोमवार ला 31 ऑगस्टच्या मध्यरात्री आमदार किशोर  जोरगेवार यांना श्वसनाचा त्रास जाणविल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.