पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
चंद्रपूर, दि.28 सप्टेंबर: सामान्य नागरिकांमध्ये कोरोना विषाणूबद्दल जनजागृती व्हावी यासाठी लहान मुलांचा सहभाग असणारी व्हिडिओ स्पर्धा जिल्हा प्रशासनाने आयोजित केली होती.
या स्पर्धेचा निकाल दिनांक 29 ऑक्टोबरला जाहीर होणार असून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
हाताची स्वच्छता, मास्क लावणे, शारिरीक अंतर, प्रशासनाच्या सुचना पाळणे, बाहेर गेल्यावर काळजी घेणे, बाजारात गर्दी न करणे अशा अनेक विषयाला अनुसरून व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आली होती.
स्पर्धेमध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मुलांनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धा 3 ते 6, 7 ते 12 व 13 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती.