चंद्रपूर वाहतुक शाखेच्या वतीने ' नो मास्क नो सवारी ' मोहिम सुरू chandrapur vahatuk

चंद्रपूर वाहतुक शाखेच्या वतीने ' नो मास्क नो सवारी ' मोहिम सुरू

चंद्रपूर, 06 ऑक्टोबर (का प्र): संपुर्ण देशात कोरोना वाळता प्रादुर्भाव पाहता त्यावर मात करण्यासाठी त्यासोबत लढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे . चंद्रपुर जिल्हयात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाळत असुन त्यास रोखण्यासाठी प्रशासन वेळोवेळी उपाययोजना करून नागरीकांमध्ये जनजागृती करीत आहे . या अनुषंगाने मा . पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री . अरविंद साळवे यांचे संकल्पनेतुन व मा . अपर पोलीस अधीक्षक श्री . प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात कोरोनाशी लढा म्हणुन ' नो मारक नो सवारी , माझे कुटुंब माझी जबाबदारी ' ही मोहीम सुरू केली आहे . या मोहिमेसाठी दिनांक ०५/१०/२०२० रोजी चंद्रपुर शहरातील आटो युनियनची मिटींग घेवुन ऑटो चालकांना कोरोना संदर्भात आणि सदर मोहिमेबाबत मार्गदर्शन करण्यात आले . सदर मोहीमेदरम्यान आज रोजी शहरातील ऑटोवर पोलीस उपअधीक्षक ( गृह ) श्री . शेखर देशमुख व वाहतुक शाखेचे पोलीस निरिक्षक श्री . हुदयनारायण यादव यांचे उपस्थितीत ' नो मास्क नो सवारी ' चे सुचनादर्शक बॅनर लावण्यात आले आहे . या मोहिमेअंतर्गत पुढील दोन दिवस बॅनर लावण्याची मोहिम घेण्यात येणार असुन ऑटो चालकांनी स्वतः मास्क घालावे व ऑटोत बसणाऱ्या प्रवाशांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात यावे असे आवाहन केले आहे . मास्क न लावणाऱ्या प्रवाशांना प्रवासाकरीता बसवु नये याबाबत सुचित करण्यात आले आहे . 

तसेच सुचनांचे पालन न करण्याऱ्याविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश सुध्दा देण्यात आले आहे . सदर मोहिमेचा सर्व ऑटो संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन शहरात मोठया प्रमाणात ऑटोची ये - जा असल्याने या मोहिमीअंतर्गत नागरीकांचे प्रबोधन करणे शक्य होणार आहे . सदर मोहिम प्राथमिक स्वरूपात चंद्रपुर शहरात सुरू करण्यात आली असुन यापुढे सदर मोहिम चंद्रपुर जिल्हयात राबविण्यात येणार आहे . याबाबत सर्व ठाणेप्रभारी यांना मा . पोलीस अधीक्षक यांनी सुचना दिल्या आहे . तरी सर्व नागरीकांनी नियमांचे तंतोतंत पालन करून कोरोनाशी लळण्यात पोलीस विभागास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे .