महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर मंत्री राज्याचे मदत आणि पूनर्वसन विजय वडेट्टीवार , परीक्षांबाबत केला मोठं विधान #Maharashtra #Corona #Lockdown #Examination

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर मंत्री 
राज्याचे मदत आणि पूनर्वसन विजय वडेट्टीवार 

परीक्षांबाबत केला मोठं विधान

विदर्भात मंगलकार्यालयांवर वॉच, कार्यक्रमांना बंदी, सिनेमागृहे बंद होणार; विजय वडेट्टीवार यांचे संकेत

कोरोनामुळे विदर्भातील चार जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मंगलकार्यालयांवर वॉच ठेवण्यात येत आहे. तसेच सिनेमागृहे बंद करण्याचा विचार सुरू आहे. विदर्भात एक बैठक घेऊन कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने काही कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचं राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. 

 विदर्भात लॉकडाऊन परवडणार नाही. अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांशी चर्चा करून लॉकडाऊन ऐवजी काय पर्यायी निर्णय घेता येईल, याचा विचार करण्यात येणार आहे. सध्या तरी आम्ही सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. कुणीही कार्यक्रम केल्यास त्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मंगलकार्यालयांवर वॉच ठेवण्यात आला आहे. सिनेमागृहांवर पूर्णत: बंदी घालण्याचाही आमचा विचार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

विदर्भातील चार राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. महाराष्ट्रही कोरोनाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे सरकार गंभीर असल्यानेच अधिवेशनचा कामकाजाचा कालावधी आठ दिवसांचा ठेवण्यात आला आहे, असं सांगतानाच मुंबईतही कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने मुंबईतील लोकल फेऱ्या कमी करण्याचा विचार सुरू आहे, असंही ते म्हणाले. मुंबईत लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

(Examination ) परीक्षांबाबत मोठं विधान

महाराष्ट्र राज्य सरकारने परीक्षांचं वेळापत्रक आधीच जाहीर केलं आहे. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने परीक्षांबाबत नव्याने निर्णय घेण्याची शक्यता आहे. परीक्षा ऑनलाईन घेता येईल का? किंवा तामिळनाडूमध्ये सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. त्या धर्तीवर काही निर्णय घेता येईल का? याबाबतचाही विचार करावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. 

महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच वन मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे मोठी गर्दी केली. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांना करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीच त्यावर उत्तर दिलं आहे. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही.