देशातील श्रीमंत उद्योगपती घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल #MukeshAmbani #मुंबई

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार

 फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल

मुंबई : मुकेश अंबानींच्या घरासमोर संशयित कार, स्फोटकांबरोबर गाडीत धमकीचं पत्र .
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानींच्या घराच्या जवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानं तपास यंत्रणा खडबडून जागी झालीय. नरिमन पाईंटच्या मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याजवळ सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओमध्ये 25 जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्यात. तर स्कॉर्पिओ गाडीत एक पत्रही सापडलं. त्यामुळे बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालेत. मुकेश अंबानींच्या घातपाताचा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी एकूण किती संपत्तीचे मालक आहेत, याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर, देशातील सर्वात महागडं हे घर आहे. दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर हा बंगला आहे. या बंगल्यात एकूण 27 मजले आहेत. या बंगल्याच्या इंटेरियरवर बरंच काम करण्यात आलं आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उचं आहे. फोर्ब्सच्या मते, या घराची किंमत जवळजवळ 6 हजार कोटी रुपये आहे. तर डॉलरमध्ये याची किंमत 2 बिलियन डॉलर( जवळजवळ 125 अब्ज) आहे. तसंच ही इमारत उभारण्यास तब्बल 11 हजार कोटी रुपये खर्च आला होता. 8 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तरी ही इमारत हलणारही नाही, असा दावा केला जातो.