पुणे : जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग (54 वर्षे) यांचे शनिवारी पहाटे उपचारादरम्यान ससून रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. गेल्या रविवारी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मागिल चार वर्षांपासून ते पुण्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावर होते.
राज्याच्या विविध भागात त्यांनी काम केले आहे. मनमिळावू स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने शासकीय यंत्रणेला आणि पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला आहे.
- असोसिएशन ऑफ स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूजपेपर्स ऑफ इंडिया चंद्रपुर जिला तर्फे भावपूर्ण श्रद्धांजलि