कोविड मृताच्या नातेवाईकासाठी सानुग्रह सहाय्य; चंद्रपुर महानगर पालिकेत हेल्प डेस्क स्थापन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी करणार मदत Sanugrah assistance for the relatives of the Kovid deceased; Establishment of Help Desk in Chandrapur Municipal Corporation Will help to apply online

कोविड मृताच्या नातेवाईकासाठी सानुग्रह सहाय्य; चंद्रपुर महानगर पालिकेत हेल्प डेस्क स्थापन 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी करणार मदत

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, ता. १७ : कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५० हजार रुपये (Fifty Thousand Rs) सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी  शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर ‘कोविड19’ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांना ऑनलाइन अर्ज (Online Application) करायचे आहेत. अर्ज भरण्‍याकरीता मृत व्यक्तीच्या नातलगांना साहाय्य करण्यासाठी आणि सविस्तर माहिती समजावून सांगण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत  हेल्पडेस्क स्थापन करण्यात आले आहे. सदर मदत केंद्रावर विनाशुल्‍क ऑनलाईन अर्ज भरण्‍यात येतील. नागरिकांनी अर्ज करतेवेळी संबंधित कागदपत्रे व मोबाईल सोबत ठेवणे आवश्‍यक आहे. सदर मदत केंद्राचे कामकाज कार्यालयीन वेळेत सुरू राहील, अशी माहिती मनपा (CMC) प्रशासनाने दिली आहे.
(Sanugrah assistance for the relatives of the Covid deceased;  Establishment of Help Desk in Chandrapur Municipal Corporation).
 (Will help to apply online).
(Chandrapur City Municipal Corporation).

कोविड-19 (Covid-19) मुळे मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारांनी mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड, (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात),मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचा आधार संलग्न बँक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) आणि रुग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस ‘कोविड19’ चे निदान झाले, अशी कागदपत्रे (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) अपलोड करावे. या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळविण्यासाठी  लॉगिन करता येईल.

एका मृत व्यक्तीसाठी एकाच जवळच्या नातेवाईकांना अर्ज करता येईल. अनेक नातेवाईकांनी केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह साहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल. अर्ज सादर करण्याबाबत व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in या पोर्टलवर डॉक्युमेंट रिक्वायर्ड या टॅबवर उपलब्ध आहे.  अर्ज भरण्‍याबाबत काही समस्‍या असल्‍यास मनपा आरोग्य विभागाच्या 9823004247, 8308800276 या क्रमांकावर संपर्क करावा.