शेत जमीन रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता मागितली होती लाच, चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, सापळा कार्यवाही दरम्यान अडकले तलाठी व कोतवाल A bribe was demanded for the work of registration of agricultural land records, Chandrapur anti-corruption department action, Talathi and Kotwal caught during the trap operation.

💥 शेत जमीन रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता मागितली होती लाच

💥 चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

💥 सापळा कार्यवाही दरम्यान अडकले तलाठी व कोतवाल   

चंद्रपूर/गोंडपिपरी : चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा या तलाठी कार्यालय मध्ये चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांचे नाव मौजा धाबा येथील सर्व्हे न १४३/२ व कोंढाणा येथील सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता धाबा साजा क्र.१७ चे तलाठी यांनी लाचेची मागणी केली व कोतवाल यांचे मार्फतीने दोन हजाराची लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील तक्रारदार तक्रारदार यांचे आजीचे नावांनी मौजा धाबा येथील शेत सर्व्हे नं १४३/२ मध्ये ०.८१ हे. आर व मौजा कोंढाणा येथील शेत सर्व्हे नं २४ मध्ये ०.५२ हे.आर. शेती जमीन होती. दिनांक ०२/०५/२०२१ रोजी तक्रारदाराची आजी मरण पावली. तक्रारदार यांचे आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांचे नाव मौजा धाबा येथील सर्व्हे न १४३/२ व कोंढाणा येथील सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता चार हजार रुपयाची लाच मागत असल्याबाबत तक्रारदार यांनी मोबाईल ऍप्सव्दारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे ऑनलाईन complaint@acbmaharastra.net वर तक्रार नोंदविली. मिळालेल्या तक्रारीवरून दिनांक २६/०९/२०२२ रोजी गै. अ. ओंकार भदाडे, तलाठी, तलाठी कार्यालय धाबा, साजा क्र. १७ यांचेविरूध्द पडताळणी कार्यवाही केली असता तक्रारदार यांचे आजीच्या मृत्युनंतर आजीचे नाव कमी करून तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांचे नाव मौजा धाबा येथिल सर्व्हे न १४३/२ व कोंढाणा येथील सर्व्हे नं २४ च्या सातबारा रेकॉर्डला नोंद करण्याच्या कामाकरिता तडजोडीअंती दोन हजार रुपयाची मागणी केली. दिनांक २८/०९/२०२२ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान गै.अ. ओंकार संजय भदाडे, तलाठी, धाबा साजा क्र. १७ यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयाची लाचेची मागणी करुन गै अ.चंद्रकांत नेमचंद मुंजेकर, कोतवाल यांचे मार्फतीने लाचरक्कम स्विकारल्याने ओंकार संजय भदाडे, तलाठी, धाबा साजा क्र. १७ व गै.अ. चंद्रकांत नेमचंद मुंजेकर, कोतवाल, तलाठी कार्यालय धाबा यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपास कार्य सुरु आहे. सदरची कार्यवाही ला.प्र.वि. नागपुर पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गिते तसेच पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे, ला.प्र. वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. जितेंद्र गुरनुले, नापोकॉ. नरेशकुमार नन्नावरे, नापोकॉ. संदेश वाघमारे, पो.अ. राकेश जांभुळकर, म.पो.अ. पु पा काचोळे, व चालक पो.अ.सतिश सिडाम ला.प्र.वि. चंद्रपुर यांनी यशस्वी पार पाडली आहे. यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/ कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

A bribe was demanded for the work of registration of agricultural land records, 

Chandrapur anti-corruption department action, 

Talathi and Kotwal caught during the trap operation.

Chandrapur/Gondpipari: In Talathi office of Dhaba in Gondpipari taluka of Chandrapur district, action of Chandrapur Anti-corruption Department after the death of grandmother has been reduced and the names of complainants and their relatives have been recorded in the Satbara records of Survey No. 143/2 of Mauza Dhaba and Survey No. 24 of Kondhana.  Talathi of Saja No. 17 demanded a bribe and was caught after accepting a bribe of two thousand through the Kotwal.  According to the information received, the complainant from Dhaba in Gondpipari taluka in the names of the grandmother of the complainant in farm survey no. 143/2 of Mauja Dhaba is 0.81.  0.52 ha in Farm Survey No. 24 at R and Mauja Kondhana.  It was agricultural land.  Complainant's grandmother died on 02/05/2021.  After the death of the complainant, after the death of the grandmother, the name of the complainant was reduced and the names of the complainant and her relatives were asked for a bribe of Rs.  Complaint registered on acbmaharastra.net.  On the complaint received dated 26/09/2022  A.  Omkar Bhadade, Talathi, Talathi Office Dhaba, Saja no.  When verification proceedings were taken against 17, after the death of the complainant's grandmother, the name of the complainant was reduced and the names of the complainant and their relatives were recorded in the Seventeen Record of Mauza Dhaba Yethil Survey No. 143/2 and Survey No. 24 at Kondhana and demanded two thousand rupees after compromise.  During the trap proceedings on 28/09/2022 G.A.  Omkar Sanjay Bhadade, Talathi, Dhaba Saja no.  17 demanded a bribe of two thousand rupees from the complainant and accepted the bribe through Gai A. Chandrakant Nemchand Munjekar, Kotwal, Omkar Sanjay Bhadade, Talathi, Dhaba Saja no.  17 and Gai.A.  Chandrakant Nemchand Munjekar, Kotwal, Talathi Office Dhaba was caught red-handed.  Further investigation is underway.

The said proceedings are against  Nagpur Deputy Commissioner of Police / Superintendent of Police Rakesh Ola, Upper Superintendent of Police Madhukar Gite and Deputy Superintendent of Police Avinash Bhamre, L.P.  Vs.  Under the guidance of Chandrapur P.N.  Jitendra Gurnule, Napoco.  Naresh Kumar Nannaware, Napoca.  Sandesh Waghmare, P.O.  Rakesh Jambhulkar, M.Po.A.  Pu Pa Kachole, and the driver P.A.Satish Sidam L.P.V.  Chandrapur has done it successfully.  Henceforth, the public is requested to contact the Bribery Prevention Department if any bribe-taking officer/employee or any private individual is demanding bribe on their behalf.