चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव Public Auction of four wheelers and two wheelers will be held

चार चाकी व दुचाकी वाहनांचा होणार जाहीर लिलाव

चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारु वाहतुकीत जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांचा जाहीर लिलाव करावयाचा आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकीबाबत कोणास दावा करावयाचा असल्यास त्यांनी न्यायालयाचे आदेश व अन्य कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. एस. पाटील यांना एक महिन्याचे आत सादर करुन वाहनाचा ताबा घ्यावा. अन्यथा, सदर वाहनाचा ई-लिलाव करुन लिलावाद्वारे प्राप्त रक्कम शासन जमा करण्यात येईल. जप्त करण्यात आलेल्या चार चाकी व दोन चाकी वाहनांची यादी या कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे चंद्रपूर, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधिक्षक संजय पाटील यांनी कळविले आहे.
Public auction of four wheelers and two wheelers will be held.