उद्या चंद्रपूरातील सिपेट संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार लोकार्पण #Prime-Minister-Narendra-Modi #Inaugurate #Cipet #Chandrapur #Central-Institute-Of-Petrochemicals-Engineering-&-Technology #Cipet-Chandrapur

उद्या चंद्रपूरातील सिपेट संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण

#Loktantrakiawaaz
चंद्रपूर, दि. 10 दिसंबर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नागपूर येथून चंद्रपूरातील तडाली औद्योगिक वसाहतीत असलेल्या सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) या संस्थेचे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण होणार आहे.

सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) ही भारत सरकारच्या रसायन व पेट्रोरसायन विभाग तसेच रसायन व खते मंत्रालयाची मान्यता प्राप्त असलेली ISO 9001:2015 प्रमाणित नामांकित संस्था आहे. सिपेट ही संस्था संपूर्ण भारतात प्लास्टिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तसेच प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकासाचे काम करत असून प्लास्टिक क्षेत्रातील आणि संबंधित उद्योगांच्या विकासासाठी प्रशिक्षण, तांत्रिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे.

महाराष्ट्रात चंद्रपूर येथे प्लास्टिक आणि संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मानव संसाधन व कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी आणि या क्षेत्रातील उद्योगांना तांत्रिक सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी सिपेट संस्था सुरु करण्यात आलेली आहे.

सद्यस्थितित सिपेट, चंद्रपुर येथे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता डिप्लोमा कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या डिप्लोमा कोर्सेसमध्ये तीन वर्ष कालावधी असलेले डिप्लोमा इन प्लास्टिक्स टेक्नोलॉजी (DPT) आणि डिप्लोमा इन प्लास्टिक्स मोल्ड टेक्नोलॉजी (DPMT) हे दोन कोर्सेस उपलब्ध आहेत. डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच विदेशात देखील बहुराष्ट्रीय प्लास्टिक उद्योग (मल्टीनेशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज) मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच, सिपेट चंद्रपूरमधून कौशल्य विकास योजनांतर्गत आतापर्यंत जवळपास 4280  विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आणि त्यापैंकी 3722 म्हणजेच 87 टक्के विद्यार्थ्यांना टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम लि., वॅरोक पॉलीमर प्रा.लि., जाबील सर्किट इंडिया प्रा.लि., आरसी प्लास्टो प्रा.लि. या व इतर नामांकित कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

बदलत्या काळानुरूप प्लास्टीक हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनलेला आहे. सध्यस्थितीत- ऑटोमोबाईल, इलेक्ट्रोनिक्स, इलेक्ट्रिकल,पाकॅसिंग, मेडीकल इ. सर्वच क्षेत्रात प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांचे अनन्य साधारण महत्व आहे. तरी चंद्रपूर व विदर्भ प्रांतातील विद्यार्थ्यांना सिपेटच्या माध्यमातून प्लास्टिक अभियांत्रिकी सारख्या आधुनिक व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमातून स्वतःचे उज्वल भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झालेली आहे.

Prime Minister Narendra Modi will inaugurate Sipet Institute in Chandrapur tomorrow through television system

#Loktantrakiawaaz
Chandrapur, Dt.  December 10: The Central Institute of Petrochemicals Engineering and Technology (CIPET) will be inaugurated by the Prime Minister of the country at 10 am from Nagpur on December 11 at 10 a.m. in Tadali Industrial Estate in Chandrapur.

Central Institute of Petrochemicals Engineering and Technology (CIPET) is an ISO 9001:2015 certified institute accredited by the Department of Chemicals and Petrochemicals and Ministry of Chemicals and Fertilizers, Government of India.  CIPET is an organization working to spread plastic technology across India as well as manpower development under special technical training programs in the field of plastic engineering and technology and providing training, technical and infrastructural facilities for the development of plastic sector and related industries.

Sipet Institute has been started by the joint efforts of the Central Government to meet the need of human resource and skilled manpower in the field of plastic and related industries and to provide technical support services to the industries in this sector at Chandrapur in Maharashtra.

Currently, the admission process for Diploma courses for the academic year 2021-22 is underway at Sipet, Chandrapur.  Among these diploma courses, two courses are available namely Diploma in Plastics Technology (DPT) and Diploma in Plastics Mold Technology (DPMT) of three years duration.  The students who have passed the diploma have a large number of employment opportunities in the multinational plastic industries within the country as well as abroad.  Also, almost 4280 students have been trained so far under skill development scheme from Sipet Chandrapur.  And out of them 3722 i.e. 87 percent of students were recruited from Tata Autocomp System Ltd., Varoc Polymer Pvt. Ltd., Jabil Circuit India Pvt. Ltd., RC Plasto Pvt. Ltd.  Employment has been made available in these and other reputed companies.

With changing times, plastic has become an integral part of human life.  Presently- Automobile, Electronics, Electrical, Packaging, Medical etc.  Plastic engineering and technology is of unique general importance in all fields.  However, the students of Chandrapur and Vidarbha province have got an opportunity to create their own bright future through modern and innovative courses like plastic engineering through CIPET.