उपद्रव शोध पथकाची कारवाई ११०० रुपयांचा दंड cmcchandrapur Nuisance investigation team action 1100 fine of Rs

उपद्रव शोध पथकाची कारवाई
११०० रुपयांचा दंड

 चंद्रपूर २१ जानेवारी - चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानातंर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ नुसार सार्वजनीक स्वच्छतेच्या दृष्टीने पतंजली मेगा स्टोर,एन एस ट्रेन, एचपी कॉम्पुटर वर्ल्ड, येवले अमृततुल्य चहा,गादीवाला, आराधना या दुकानांवर रस्त्यावर थुंकणे, कचरा रस्त्यावर टाकणे  व दुकानासमोर डस्ट बिन न ठेवल्याने दंडात्मक कारवाईद्वारे ११०० रुपये वसुल करण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले तसेच इतर सर्व व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनेवर कचरापेटी ठेवणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास आणि आस्थापनेच्या १० चौरसफूट परिसरात अस्वच्छता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने दिला आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत " उपद्रव शोध पथक " ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे शहरातील सार्वजनीक स्वच्छता अबाधित ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन नियमाची अंमलबजावणी करणे, उपद्रव थांबविणे, प्लास्टीक कचरा नियम अंमलबजावणी व नागरीकांमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या कृतीमध्ये व्यावहारीक बदल घडविणे व दंडात्मक कारवाई करणे इत्यादी कारवाई केली जात आहे.
Nuisance investigation team action
 1100 fine of Rs