२६ जानेवारी २०२३ ला संध्याकळी ६.३० वाजता. शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळ तर्फे “ भारत माता पुजन ” चा कार्यक्रमानिमित्य चैताली खटी यांचा एक पात्री नाट्यप्रयोग शहीद भगतसिंग चौक, पठाणपुरा रोड चंद्रपुर येथे होणार आहे
कार्यक्रमात झाशीच्या राणीवर
नाटक सादरीकरण होणार असुन या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सौ. चैताली खटी, कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रपुर जिल्हा पोलीस उपअधिक्षक राधिका फडके व कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी स्मिता जीवतोडे, संचालिका चांदा पब्लिक स्कूल, चंद्रपूर ह्या असतील.
२१ व्या शतकात युवक देशाभिमुख जगला पाहिजे व सर्व युवकांनी देशाच्या चांगल्या कामात नेहमी अग्रेसर राहावे. जे काही देशविरोधी कारवाया सुरु आहे त्या सर्वाना चोख उत्तर द्यावे याच उदात्त हेतूने देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात भारत मातेचे पुजन केले जाणार. त्या नंतर चैताली खटी यांचे एक पात्री नाटक सादर होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी व युवा वर्गानी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून भारत मातेचे पुजन करावे व जाहीर प्रबोधनाचा लाभ घ्यावा. असे आव्हान शहीद भगतसिंग चौक मित्र मंडळतर्फे करण्यात आले आहे.
On January 26, a character play will be performed on the Queen of Jhansi on the occasion of “Bharat Mata Pujan”