▪️11 में रोजी सम्पूर्ण महाराष्ट्रात धरने
#Loktantrakiawaaz
चंद्रपुर: माध्यमांकडे लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने शासनाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. याचा व्हॉइस ऑफ मीडिया या देशव्यापी संघटनेला खेद आहे. व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने गुरुवार 11 में रोजी महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधत आहोत.
👉🏻 व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रमुख मागण्या
१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा.
२) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी.
३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा.
४) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा.
५) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे.
६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण "क" वर्ग दैनिके (लघु दैनिक/साप्ताहिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांना व साप्ताहिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
या मागण्यांच्या पुर्ततेसाठी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने गुरुवार 11 में रोजी चंद्रपुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व चंद्रपुर जिल्ह्यातील पूर्ण तालुका स्तरावर धरणे आंदोलन केले जाणार आहे.
Voice of Media's massive dharna movement to demand justice for newspapers and journalists
▪️Dharnas in entire Maharashtra on May 11
#Loktantrakiawaaz
Chandrapur: Media goes first as the fourth pillar of democracy. However, no measures are taken by the government to solve the problem of media workers. Voice of Media, a nationwide organization, regrets this. On behalf of Voice of Media, we are drawing the attention of the government to the following demands through the Maharashtra statewide agitation on Thursday 11 May.
👉🏻 Major demands of Voice of Media
1) A separate welfare corporation for journalists should be established and given substantial funds.
2) Journalists who have completed 5 years in journalism should be given a letter of recognition immediately.
3) The GST currently applicable to newspapers should be abolished.
4) It should be decided to provide government plots as a special matter for journalists' houses.
5) Journalists who lost their lives in Corona should be given the status of front line workers and the families of the deceased journalists should be rehabilitated accordingly.
6) The present advertisement policy of the government is a bane to "C" class dailies (small daily/weeklies). Small dailies and weeklies should also be given the same advertisement as medium (B class) dailies. Advertisements should be given to the weekly as well.
In order to fulfill these demands, Voice of Media is going to protest on 11 May in front of the Chandrapur Collectorate and at the full taluka level of Chandrapur district.
#Voice of Media's
#massive #dharna movement demand #Justice #newspapers #journalists
#Maharashtra #VOM