चंद्रपूर : लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय समोर ठेवुन राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हाॕईस आॕफ मीडियाच्या बारामती येथील राज्यव्यापी शिखर आधिवेशनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ७० पञकार रवाना झाले आहेत.
पञकारांचे हित आणि अडीअडचणीवर विचार मंथन होवुन करावयाच्या कार्याची रूपरेषा ठरविण्यासाठी व्हाॕईस आॕफ मीडियाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील बारामती येथे दि. १८ आणि १९ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्यव्यापी शिखर आधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. विद्या प्रतिष्ठानच्या भव्य परीसरातील गदीमा सांस्कृतिक सभागृहात आयोजित पञकारांच्या दोन दिवसीय आधिवेशानाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंञी ना. एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार आहे. विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित आधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंञी ना. देवेन्द्र फडणवीस, ना.अजीत पवार, शरदचंद्र पवार, सुप्रीया सुळे यांचे सह वृत्तपञ सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर संपादक व पञकार मंडळी प्रामुख्याने उपस्थित राहुन पञकारांना मार्गदर्शन करणार आहेत. पञकारांचे हित डोळ्यासमोर ठेवुन आयोजित करण्यात आलेल्या पञकारांच्या अभुतपुर्व आधिवेशनाला चंद्रपूर जिल्ह्यातील व्हाईस आँफ मीडियाचे ७० च्या वर सदस्य उपस्थित राहण्यासाठी आज दुपारी विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, साप्ताहीक विंगचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड, डिजीटल विंगचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार आणि कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडीया यांचे नेतृत्वात खाजगी बसने बारामती कडे रवाना झाले आहेत.