अधिकृत स्थळांवरच व्हावी फटाके विक्री मनपा आयुक्तांचे आदेश
चंद्रपूर ८ नोव्हेंबर - दिवाळीच्या पार्शवभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणांहुनच फटाक्यांची विक्री करण्याचे स्टॉल्स लावण्याचे व विक्री करण्याचे निर्देश मनपाद्वारे दिले गेले आहेत, अन्यथा प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
मनपातर्फे कोहिनुर तलाव व मुल रोडवरील कुंभार सोसायटी ग्राऊंड ही स्थाने फटाके विक्री करण्याची दुकाने लावण्यास निश्चित करण्यात आली आहेत. जनहित याचिका क्र. 152 / 2015 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यासाठी फटाके स्टॉल्सच्या उभारणीत नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पथके गठीत करण्यात आली आहे.
परवानगी नअसलेल्या ठिकाणांहुन फटाके विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असुन अश्या प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. बंदी असलेले फटाक्यांची विक्री करता येणार नसुन परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे. तसेच फटाके विक्री असलेल्या जागी आतिशबाजी करण्यास मनाई आहे.
भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. 682(ई), दि. 05/10/1999 अन्वये 125 डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत.त्यामुळे शक्यतो हरित दिवाळीच साजरी करावी,फटाके फोडायचे असल्यास सायंकाळी ७ ते १० दरम्यानच फोडण्यात येण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
Action will be taken against unauthorized sellers of firecrackers, order of municipal commissioner to sell firecrackers only at official places
#Actionwillbetakenagainstunauthorizedsellersoffirecrackers #orderofmunicipalcommissioner #sellfirecrackers #officialplaces #DipawaliFatake #Fatake #cmc #cmcChandrapur #Chandrapur #ChandrapurFatake