Chandrapur Lok Sabha Election : आमदार जोरगेवार म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे माझे गुरू !सुधीर मुनगंटीवार देशाच्या संसदेत जात असल्याचा अनेकांना आनंद- आमदार जोरगेवार


Chandrapur Lok Sabha Election : आमदार जोरगेवार म्हणाले, सुधीर मुनगंटीवार हे माझे गुरू !

सुधीर मुनगंटीवार देशाच्या संसदेत जात असल्याचा अनेकांना आनंद- आमदार जोरगेवार

चंद्रपुर, 17 अप्रैल : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आज चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शहरातील शकुंतला लॉनमध्ये घेतला. सुधीर मुनगंटीवार हे माझे गुरू आहेत, असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.

आमदार जोरगेवार म्हणाले, मला काही लोक नेहमी विचारतात, की तुम्ही सुधीर मुनगंटीवार यांना कॉपी करता का? कारण आमचं नातंच भावा-भावाचं आहे. तेव्हा मी सुधीर मुनगंटीवार माझे मोठे भाऊ आहेत. त्यांच्यासोबतचा माझा सहवास मोठा आहे. मी कबूल करतो की, ते माझे गुरू आहेत. त्यांची काम करण्याची शक्ती अफाट आहे. काम करताना ते कोणत्या दिशेने गेले पाहिजे, याचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. नियोजनबद्ध पद्धतीने काम करणार नेता महाराष्ट्रात जर कुणी असेल, तर ते सुधीर मुनगंटीवार आहेत, असे म्हणत त्यांनी मुनगंटीवार यांचे कौतुक केले.

काल मंगळवारी माझ्याकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते. परवा सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला. वर्षा निवासस्थानी त्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीला 9 मंत्री उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विचारले की सुधीर मुनगंटीवार यांची निवडणूक कशी सुरू आहे. मी त्यांना सांगितले की, ते निवडून आले. तेव्हा एक मंत्री म्हणाले की, आता 'भाऊ' राज्याच्या मंत्रिमंडळात राहणार नाहीत, लगेच दुसरे मंत्री गमतीने म्हणाले की, आता कॅबिनेटही लवकर संपत जाईल. कारण बैठकीत 'सुधीर भाऊ' सखोल अभ्यासपूर्ण चर्चा करतात, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार देशाच्या संसदेत जात असल्याचा अनेकांना आनंद आहे. काँग्रेसमधीलही काही लोकांना याचा आनंद आहे. कारण राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्रिपद रिकामं होणार आहे. त्यांनीही तशी 'सेटींग' नक्कीच लाऊन ठेवली असणार. कारण त्यांनाही आता मंत्रिपद खुणावू लागलं आहे, असे आमदार जोरगेवार यांनी कुणाचेही नाव न घेता सांगितले. त्यामुळे काँग्रेसमधील असा नेता कोणता आहे, याची चर्चा साता रंगू लागली आहे.

हल्ली सभांना रोजी देऊन (पैसे देऊन) कार्यकर्ते आणि लोक आणले जातात. पण आमचे यंग चांदा ब्रिगेडचे हे सर्व कार्यकर्ते गोरगरीब, कष्टकरी आहेत. हे सर्व जण रोजी घेऊन नव्हे तर त्यांची बुडवून येथे माझे गुरू सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आलेले आहेत, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

Chandrapur Lok Sabha Election: MLA Jorgewar said, Sudhir Mungantiwar is my guru!


 Many people are happy that Sudhir Mungantiwar is going to the Parliament of the country - MLA Jorgewar

#Chandrapur-Lok-Sabha-Election। #MLA-Jorgewar #Sudhir-Mungantiwar-is-my-guru!


 Many people are happy that Sudhir Mungantiwar is going to the Parliament of the country - MLA Jorgewar