बांगलादेश हिंदुच्या समर्थनार्थ
चंद्रपूर, 09 डिसेंबर :बांगलादेशातील हिंदू, सिख, बौध्द, जैन या अल्पसंख्यांक समाजावर इस्लामिक अतिरेक्यानी मागील अनेक महिन्यापासून अत्याचार, ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ सुरु केला आहे. या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावेल उचलण्याऐवजी संध्याचे बांगलादेश सरकार व इतर संबंधित यंत्रणा मूक प्रेक्षक बनून राहिल्या आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याचा अवलंब केला. तेव्हा अन्याय आणि अत्याचाराचा एक नवीन टप्पा दिसून येतो आहे. हिंदुच्या अशा शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी पूज्य चिन्मय कृष्ण दास जी यांना बांगलादेश सरकारने अटक करणे अन्यायकारक आहे.
या गंभीर प्रसंगी भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे हा भाव व्यक्त करण्याकरीता चंद्रपुरात १० डिसेंबर २०२४ रोज मंगळवार ला दुपारी २:३० वाजता भव्य न्याय यात्रा निघणार असून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाजाने केले आहे.
न्याय यात्रा हि गांधी चौक येथून निघून जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता होणार व जिल्हाधिकारी यांना सकल हिंदू समाज, चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात येणार आहे. या न्याय यात्रेत हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान सकल हिंदू समाज, चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे.
Grand Nyayatra tomorrow in Chandrapur, Bangladesh in support of Hindus
#NyayatratomorrowinChandrapurBangladeshInsupportofHindus
#NyayatraChandrapur
#BangladeshHindus
#SakalHinduSamajChandrapur
#ChandrapurSakalHinduSamaj
#Chandrapur