भाजपचा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध, खासदार गिरीश बापटांनी केलं मोठं विधान #BJPOPPOSE #ONEMEMBER WARDSTRUCTURE #BJP #Maharashtra

भाजपचा एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध, 

खासदार गिरीश बापटांनी केलं मोठं विधान
#Loktantrakiawaaz
#ElectionNews
पुणे, 26 ऑगस्ट:  निवडणूक आयोगाने (Election) महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यी प्रभाग पद्धती जाहीर केली आहे. भाजप खासदार गिरीश बापट (Khasdar Girish Bapat) यांनी या पद्धतीला विरोध केला आहे. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे, असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे. 

भाजप नेते (BJP), खासदार गिरीश बापट यांनी टीवी चैनलशी बोलताना एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध असल्याचं सांगितलं. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा महाराष्ट्र राज्य सरकारचा निर्णय आहे, कॅबिनेट काय निर्णय घेते ते बघू, असं बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

साभार- टीवी 9