राष्ट्रसंतांचे कार्य घराघरात पोहोचावेचित्रपटाला सहकार्य करण्याची आ.सुधीर मुनगंटीवार यांची मागणी Rashtrasant's work should reach door to door MLA Sudhir Mungantiwar's request to cooperate with the film #Loktantrakiawaaz

राष्ट्रसंतांचे कार्य घराघरात पोहोचावे

चित्रपटाला सहकार्य करण्याची आ.सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

#Loktantrakiawaaz

मुंबई : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य अधिक व्यापकपणे घराघरात पोहोचले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकारने तुकडोजी महाराजांवर आधारित चित्रपटाला सहकार्य करावे, अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारने काही मुद्द्यांचा समावेश करण्याबाबतच्या विषयावर ते बोलत होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विश्वशांतीसाठी मोलाचे कार्य केले. स्वातंत्र्य लढा, राष्ट्रीय एकात्मता, ग्रामविकास आणि मानवता धर्मावर महाराजांनी केलेले कार्य अमूल्य असेच आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील गुरकुंज परिसरातील दासटेकडी येथे महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटनिर्मितीचे काम हाती घेतले आहे. चित्रपटाचा प्रस्तावही त्यांनी दिला आहे. तुकडोजी महाराजांनी समाजाला ग्रामगीता दिली. जीवनाचा मार्ग दाखविला. मानवधर्म शिकविला, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटनिर्मितीच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता द्यावी. चित्रपटाच्या निर्मितीसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी निधीही उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली.

Rashtrasant's work should reach door to door.
 MLA Sudhir Mungantiwar's request to cooperate with the film.