चंद्रपुर जिल्ह्यात 4 बाधितांचा मृत्यू ;228 नव्याने पॉझिटिव्ह,चंद्रपूर शहर व परिसरातील 101, बाधितांची एकूण संख्या 15277 corona Chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत 12199 बाधित कोरोनामुक्त

चंद्रपुर जिल्ह्यात 4 बाधितांचा मृत्यू ;228 नव्याने पॉझिटिव्ह

 बाधितांची एकूण संख्या 15277

 उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2851

चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे चार मृत्यू झाले असून 228 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 15 हजार 277 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 151 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 12 हजार 199 झाली आहे. सध्या 2 हजार 851 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 17 हजार 696 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 878 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमूर तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष, 

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील 70 वर्षीय पुरुष,

 ब्रह्मपुरी शहरातील पेठ वार्ड येथील 72 वर्षीय पुरुष व 

भद्रावती येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 227 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 214, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली चार, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 124 पुरूष व 104 महिलांचा समावेश आहे. 

यात चंद्रपूर शहर व परिसरातील 101, 

पोंभूर्णा तालुक्यातील तीन, 
बल्लारपूर तालुक्यातील आठ, 
मुल तालुक्यातील 22, 
गोंडपिपरी तालुक्यातील दोन, 
जिवती तालुक्यातील एक
 कोरपना तालुक्यातील 12, 
ब्रह्मपुरी तालुक्यातील 27, 
नागभीड तालुक्यातील 14,  
वरोरा तालुक्यातील सात, 
भद्रावती तालुक्यातील आठ, 
सावली तालुक्यातील दोन, 
सिंदेवाही तालुक्यातील सात, 
राजुरा तालुक्यातील एक, 
गडचिरोली 12 तर भंडारा येथील एक असे एकूण 228 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

इंदिरा नगर अयोध्या चौक परिसर, दुर्गापुर, शक्तिनगर, जुनोना चौक बाबुपेठ, संजय नगर, बालाजी वार्ड,नकोडा, घुग्घुस, एकोरी वार्ड, शास्त्रीनगर, अंचलेश्वर वार्ड, अरविंद नगर, गौतम नगर, पठाणपुरा, नगीना बाग,  चिचपल्ली, ऊर्जानगर, साईकृपा कॉलनी परिसर, तुकूम, इंदिरानगर, पडोली, विठ्ठल मंदिर वार्ड, राजीव नगर, वडगाव, स्नेह नगर, सुशील नगर, शिवाजीनगर, घुटकाळा वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

वरोरा तालुक्यातील दत्त मंदिर वार्ड, शांतीवन लेआउट परिसर, माढेळी, बोर्डा, जिजामाता वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मेढंकी, शेष नगर, विद्यानगर, शांतीनगर, अरेर नवरगाव, हनुमान नगर, भवानी वार्ड, गजानन नगर, बोंडेगाव, पेठ वार्ड, प्रबुद्ध नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील नवीन सुमठाणा, कटारिया लेआउट, शिवाजीनगर, चंडिका वार्ड, डिफेन्स चांदा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील देलनवाडी, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मुसाभाई नगर, किटाळी, बाळापुर, अनुसया नगर, तळोधी, हनुमान मंदिर वलनी, गोवर्धन चौक परिसर,कोथुर्णा, भागातून बाधित पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील  गडचांदूर, पार्डी, माणिक गड कॉलनी परिसर, आंबेडकर भवन परिसर वैशाली नगर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील नागाळा, चितेगाव, डोंगरगाव, चिंचाळा परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, दादाभाई नौरोजी वार्ड, रेल्वे वार्ड, श्रीराम वार्ड, कोठारी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.