पर्यटकाच्या वाहनाला अपघात, 1 मृत्यु, 4 जख्मी Vehicle Accident Tadoba

पर्यटकाच्या वाहनाला अपघात, 1 मृत्यु, 4 जख्मी

चंद्रपूर , 1दिसम्बर : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या चिमूर ते कोलारा मार्गावर तुकूम फाट्याजवळ मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास पर्यटकाच्या वाहनाला अपघात होऊन एक महिला ठार झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात चार पर्यटक जखमी झाले आहेत. सना गोयल (13) असे मृतकाचे नाव आहे. जखमीपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून नागपूरला हलविले. दोघांवर चिमूर येथेच उपचार सुरू आहे. फोर्ड कार क्रमांक MH49 2489 ला अपघात झाला आहे.

        वाहनात नागपूरहुन गोयल परिवारातील 7 पर्यटक ताडोबात सफारीसाठी येताना ही घटना घडली.