महाराष्ट्र चे मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण,

मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात सहभागी

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली. वडेट्टीवार हे सध्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाले आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात हण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.


महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मंत्री विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान अधिवेशनापूर्वी  अधिवेशनात 3200 जणांची कोव्हिड-19 ची टेस्ट करण्यात आली होती. यात 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 23 पोलीस कर्मचारी आणि दोन पत्रकारांचा समावेश आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये विधीमंडळ, मंत्रालय, पोलीस सुरक्षा आदींचा समावेश आहे. बहुतेक आमदारांनी खासगी टेस्ट केल्याने त्यांचा डाटा उपलब्ध नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. गेल्या दोन दिवसांपासून ही कोरोना चाचणी करण्यात येत होती. काही आमदारांचीही चाचणी झाली होती. मात्र या आमदारांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

कोरोनाची लागण झालेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री
कॅबिनेट मंत्री

1) जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : एप्रिल 2020 – कोरोनामुक्त़
2) अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 25 मे 2020 – कोरोनामुक्त
3) धनंजय मुंडे – सामाजिक न्याय मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 12 जून 2020 – कोरोनामुक्त
4) अस्लम शेख – वस्त्रोद्योग मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 20 जुलै 2020 – कोरोनामुक्त
5) बाळासाहेब पाटील – सहकार मंत्री (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 15 ऑगस्ट 2020 – कोरोनामुक्त
6) सुनील केदार – दुग्धविकास मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 3 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
7) नितीन राऊत – ऊर्जा मंत्री (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
8) हसन मुश्रीफ – ग्रामविकास मंत्री (राष्ट्रवादी) – 18 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
9) एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री (शिवसेना) – 24 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
10) वर्षा गायकवाड – शिक्षणमंत्री (काँग्रेस) – 22 सप्टेंबर – कोरोनामुक्त
11) अनिल परब – परिवहनमंत्री (शिवसेना) – 12 ऑक्टोबर – कोरोनामुक्त
12) अजित पवार – उपमुख्यमंत्री, (राष्ट्रवादी ) – 26 ऑक्टोबर 2020 – कोरोनामुक्त
13) दिलीप वळसे पाटील, कामगार मंत्री – कोरोनामुक्त
14) जयंत पाटील – जलसंपदा मंत्री – 18 फेब्रुवारी 2021 – कोरोना संसर्ग
15) राजेश टोपे – आरोग्य मंत्री – 18 फेब्रुवारी 2021 – कोरोना संसर्ग
16) अनिल देशमुख – गृहमंत्री – 5 फेब्रुवारी 2021- कोरोनामुक्त
17) राजेंद्र शिंगणे – अन्न आणि औषध प्रशासन मंत्री – 16 फेब्रुवारी 2021- कोरोना संसर्ग
18) छगन भुजबळ- अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री- कोरोनाग्रस्त

राज्यमंत्री

1) अब्दुल सत्तार – महसूल (शिवसेना) – कोरोनाची लागण : 22 जुलै 2020 – कोरोनामुक्त
2) संजय बनसोडे – पर्यावरण, रोहयो (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 2020 – कोरोनामुक्त
3) प्राजक्त तनपुरे – नगरविकास, ऊर्जा (राष्ट्रवादी) – कोरोनाची लागण : 7 सप्टेंबर 2020 – कोरोनामुक्त
4) विश्वजीत कदम – सहकार, कृषी (काँग्रेस) – कोरोनाची लागण : 11 सप्टेंबर 2020- कोरोनामुक्त
 5) बच्चू कडू – शालेय शिक्षण (अपक्ष) – कोरोनाची लागण : 19 सप्टेंबर 2020-कोरोनामुक्त
 6) सतेज पाटील – गृहराज्यमंत्री – 9 फेब्रुवारी 2021- कोरोनामुक्त
7) दत्तात्रय भरणे, जलसंपदा राज्यमंत्री