🔥चंद्रपुर महाकाली मंदिरात बॉम्ब? #Bomb-in-Chandrapur-Mahakali-Temple #Chandrapur-Police #Mockdrill #Mahakali-Mandir #Police

🔥चंद्रपुर महाकाली मंदिरात बॉम्ब?

🔥महाकाली मंदिरातील प्रकार पोलिसांची मॉक ड्रील,

🔥नागरिकांना घाबरण्याची गरज नाही - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर: आज सकाळच्या सुमारास महाकाली मंदिरात बॉम्ब असल्याची माहिती पसरली पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिघांना ताब्यात घेतले. या कार्यवाहीचे काही नागरिकांनी चित्रीकरण करत सोशल माध्यमांवर टाकले. मात्र हा सर्व प्रकार पोलिसांचा मॉक ड्रीलचा म्हणजेच नियमित सरावाचा भाग असुन असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. आपण अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रातुन म्हटले आहे कि, चंद्रपूर पोलिस हे नेहमी तत्पर असतात. अराजक तत्वांवर नियंत्रण ठेवून शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम त्यांच्या वतीने केल्या जात आहे. दरम्याण शहरात मोठ्या अनुचित घटणा घडल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठीचे सराव त्यांच्या वतीने नियमीत केल्या जात असते. असाच प्रकार आज घडला आहे. सकाळच्या सुमारास पोलिसांनी महाकाली मंदिरात यशस्वी सराव केला आहे.
महाकाली मंदिरात बॉम्ब असल्याचे बनावटी नाट्य करत काही मिनीटात त्यांनी हा पुर्वनियोजित बॉम्ब शोधत नाट्यक्रमाचा भाग असलेल्या तिघांना ताब्यात घेत यशस्वी सराव पार पाडला आहे. मात्र या सरावाचे काही नागरिकांनी मोबाईल मध्ये चित्रीकरण करत सोशल माध्यमांवर टाकले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र हा पोलिसांच्या सरावाचा भाग आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. सोशल माध्यमांवर येणा-या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहण सदर प्रसिध्दी पत्रातुन आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना केले आहे.
Bomb in Chandrapur Mahakali Temple?