⭕ उपतालुका प्रमुखांची नियुक्ती असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती
वरोरा : वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख पदी रवींद्र शिंदे यांची नियुक्ती होताच पक्षात नवचैतन्य संचारले आहेत. ज्येष्ठ व युवा शिव सैनिकांना सोबत घेवून त्यांचे कार्य सुरू झाले असून त्यांच्या नेतृत्वात वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्षातर्फे प्रमुख नियुक्त्या होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख यांचे आदेशाने वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्रात विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात माजी जिल्हा प्रमुख अजय स्वामी यांच्या अध्यक्षतेत आज (दि.१३) ला असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खांबाडा येथे आढावा बैठक संपन्न झाली.
या आढावा बैठकीला अजय स्वामी (माजी जिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रपूर), वरोरा - भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, दत्ता बोरेकर तालुका प्रमुख, भास्कर ताजने उप जिल्हा प्रमुख, नर्मदा बोरेकर जिल्हा प्रमुख महिला आघाडी, विद्या ठाकरे उप जिल्हा प्रमुख महिला आघाडी, माया नाकाडे मंचावर उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांनी केले. या प्रास्ताविकेत त्यांनी पक्षाचे पुढील ध्येयय धारणे व संघटनात्मक बांधणीवर सविस्तर मार्गदर्शन केले. या बैठकीत वरोरा तालुक्यातील इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा प्रवेश घेण्यात आला. माजी जिल्हाप्रमुख अजय स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये सालोरी येसा जिल्हा परिषद सर्कल चे उपतालुका प्रमुख म्हणून अरुण महल्ले, खांबाडा आबामक्त जिल्हा परिषद सर्कल चे उपतालुका प्रमुख म्हणून सुधाकर बुऱ्हाण टेमुर्डा चिकणी जिल्हा परिषद सर्कल चे उपतालुका प्रमुख म्हणून गजानन गोवारदीपे आणि आबामक्ता पंचायत समिती चे उपविभाग प्रमुख म्हणून देवेंद्र बोधाने यांची नियुक्ती करण्यात आली.
➡️ शिवसैनिकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही - रवींद्र शिंदे
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझी विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती केली. पक्षप्रमुखाने दिलेल्या जबाबदारीला खांद्यावर घेऊन पक्ष संघटनेचे काम मजबूत करणे हेच आमचे ध्येय असून शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, पक्षाचे ८०% समाजकारण व २०% राजकारण पक्षाचे ध्येयधोरण याबाबत व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात केलेली लोकहितार्थ कामे व कोरोना काळात संपूर्ण राज्यातील जनतेचे कुटुंब प्रमुख म्हणुन घेतलेली जवाबदारी, कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी दिलेले निर्देश व राज्यातील जनतेच्या हिताचे घेतलेले निर्णय याबाबत संपूर्ण माहीती जनतेपर्यंत पर्यंत पोहचविणे, पक्ष सघंटन मजबुतीने वाढविण्याच्या दुष्टीने कार्य सुरु केले असून पक्ष संघटनेत कुठलेच मतभेद नसून सर्वांना सोबत घेऊन काम पुढे न्यायचे आहे, असे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले. पुढे बोलतांना शिंदे म्हणाले कि पक्ष वाढीचे काम सुरु असून आज माझे गुरुवर्य अजय स्वामी यांच्या साक्षीने आपणास ग्वाही देतो कि माझा हातून भविष्यात कुठलेच अनुचित काम घडणार नाही. पण माझा शिवसैनिकांवर अन्याय झाला तर तो खपवूनही घेणार नाही. शिवसैनिकांनी माझा पर्यंत घेऊन आलेले कोणतेही काम त्या कामाची सत्यता पडताळून त्याला योग्य तो न्याय देण्यात येईल त्याच सोबत वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात विशेष करून शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली असून अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपांना विधुत जोडणी करिता डिमांड भरून वर्ष लोटूनही त्यांच्या कृषी पंपांना अजून पावेतो विद्युत जोडणी करण्यात आली नाही. या मागणीला घेऊन लवकरच आम्ही आंदोलन करू व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असेल अशी ग्वाही देतो.
➡️ पक्षप्रमुखांनी संघटनेला बळकटी देण्यासाठी रवींद्र शिंदे यांची केली नियुक्ती स्वागतस्पद
अनेक लोकप्रतिनिधी, राजकीय नेते हे शिवसेनेमधूनच घडले असून स्वार्थासाठी त्यांनी पक्ष बदल केला आहे. वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेचा बालेकिल्ला असून या क्षेत्रातील सध्याची पक्षाची परिस्थिती बघता या परिस्थितीवर मत करण्यासाठी पक्षप्रमुखांनी रवींद्र शिंदे यांची केलेली नियुक्ती स्वागतस्पद असून त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या नियुक्तांमुळे संघटनेला बळकटी येऊन भविष्यात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये भगवा फडकला शिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी शिवसेनेचे विचार आणि आणि पक्षप्रमुकांनी अडीच वर्षात केलेले काम जनतेपर्यंत पोहचवा विजय आपलाच आहे, मी सदैव आपल्या सोबत आहे असे मत व्यक्त केले.